Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Gautami Patil : 'तू जशी आहेस तशी मला आवडली...', बीडच्या शेतकरी पुत्राची...

Gautami Patil : ‘तू जशी आहेस तशी मला आवडली…’, बीडच्या शेतकरी पुत्राची गौतमी पाटीलला लग्नाची मागणी

Subscribe

गौतमी पाटील हे नाव सोशल मीडियावर (Social Media) सध्या प्रचंड चर्चेत आहे. राज्यातील सर्वांच्याच मनावर गौतमी पाटील (Gautami Patil) अधिराज्य गाजवत आहे. एकीकडे डान्सवरून गौतमीचे कौतुक केले जाते तर, दुसरीकडे गौतमी विरोधात तक्रारही दाखल केल्या जात आहेत. मात्र आता कोणत्या डान्समुळे नाही तर एका वेगळ्याच किस्स्यामुळे गौतमी पाटील चर्चेत आली आहे.

गौतमी पाटील हे नाव सोशल मीडियावर (Social Media) सध्या प्रचंड चर्चेत आहे. राज्यातील सर्वांच्याच मनावर गौतमी पाटील (Gautami Patil) अधिराज्य गाजवत आहे. एकीकडे डान्सवरून गौतमीचे कौतुक केले जाते तर, दुसरीकडे गौतमी विरोधात तक्रारही दाखल केल्या जात आहेत. मात्र आता कोणत्या डान्समुळे नाही तर एका वेगळ्याच किस्स्यामुळे गौतमी पाटील चर्चेत आली आहे. ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गौतमी पाटील हिला लग्नाची मागणी आली आहे. बीडच्या एका शेतकरी पुत्राने गौतमी पाटीलला लग्नाची मागणी घातली आहे. (Gautami Patil Farmer Son Asking For Marriage To Gautami Patil From Beed Sent A Letter)

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील रोहन गलांडे पाटील (Rohan Galande Patil) या तरुणाने गौतमीला थेट लग्नाची मागणी घातली आहे. लग्नाच्या मागणीसाठी रोहन याने गौतमीला पत्र लिहिले आहे. या पत्रात त्याने तुझ्या इच्छा-अटी सगळ्या मान्य, बोल तू होती का माझी परी? असे लिहिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – संभाजीराजेंचा U Turn; गौतमी पाटीलला दिलेला पाठिंबा घेतला मागे, म्हणाले अशी ‘कला’..

नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. शिवाय गौतमीनेही लग्नाबद्दलच्या आपल्या अपेक्षा काय आहेत? त्या एका मुलाखतीतून सांगितल्या होत्या. ‘संसार थाटण्याचा विचार असून योग्य आणि समजून घेणारा जोडीदार पाहिजे’, असे गौतमी म्हणाली होती. त्या मुलाखतीचा दाखला देत रोहन गलांडे पाटील याने गौतमीला पत्र लिहिले.

रोहनने गौतमीला लिहिलेल्या पत्रात काय?

- Advertisement -

“तू जशी आहेस तशी मला आवडली आहेत. तुझ्यासोबत कुणी लग्न करत नसेल तरी मी माणुसकीच्या नात्याने तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. मी एक शेतकरी पुत्र असून शेती, दूध सगळं संपन्न आहे. तुझी तयारी असेल तर भेटायला ये”, असे पत्र रोहन गलांडे पाटील याने लिहिले आहे.

हेही वाचा – …तेव्हा दोन वेळचं जेवण तुम्ही देत होता का? अमोल कोल्हेंचा गौतमी पाटीलला पाठिंबा

गौतमी पाटील विरोधात बार्शीत गुन्हा दाखल

दरम्यान, गौतमी पाटील हिच्यावर सोलापूरच्या बार्शी येथे फसवणुकीच्या गुन्हा दाखल करण्यात आला. यावरून करण्यात आलेल्या आरोपांचा गौतमी पाटील हिने खंडन केले. आपण वेळेतच कार्यक्रमाला पोहोचलो होतो, पण जे काही आरोप करण्यात आले आहेत, तक्रार दाखल करण्यात आली आहे, त्याची सखोल माहिती घेऊन यावर पुढील भाष्य करू, असे गौतमी पाटील हिने स्पष्ट केले. त्याचबरोबर अजून आपलं लग्न ठरलं नाही आणि लग्नाचा अजून कोणताही विचार नसल्याचे, देखील गौतमी पाटील हिने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -