घरमहाराष्ट्रGautami Patil : दोन पाटलांचा रंगला फड; राष्ट्रवादी, शिवसेनेत जुंपली

Gautami Patil : दोन पाटलांचा रंगला फड; राष्ट्रवादी, शिवसेनेत जुंपली

Subscribe

 

पुणेः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमांपेक्षा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना अधिक गर्दी होते, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले. याला शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गौतमी पाटील हिच्यावरून या दोन पाटलांमध्ये चांगलाच तमाशाचा फड रंगला आहे.

- Advertisement -

पुण्यातील खेडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा नुकताच वाढदिवस झाला. या कार्यक्रमात दिलीप मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमापेक्षा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला अधिक गर्दी असते, असे वक्तव्य दिलीप मोहिते पाटील यांनी केले. याला शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उत्तर दिले.

दिलीप मोहिते पाटील हे वेड्याच्या नंदनवनामध्ये जगत आहेत. तो अज्ञानी आहे. दिलीप मोहिते पाटील हा एक वादग्रस्त विषय आहे, अशी टीका शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली होती. तुम्ही एकनाथ शिंदेंची सभा बघता. त्यांच्या गर्दीची तुलना गौतमीच्या कार्यक्रमाशी करता. मात्र आम्ही गौतमीची तुलना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबत करू शकतो. पण आम्ही पवारांना मानणारे आहोत. आम्ही तसे करणार नाही, असेही माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचाःGautami Patil : ‘तू जशी आहेस तशी मला आवडली…’, बीडच्या शेतकरी पुत्राची गौतमी पाटीलला लग्नाची मागणी

अमोल कोल्हेंचा गौतमीला पाठिंबा

लावणी नृत्यांगना म्हणून गौतमी पाटील हिची क्रेझ निर्माण झाली आहे. परंतु कला क्षेत्रामध्ये मिळत असलेले यश कधीच कायमस्वरुपी नसते. आज तिच्यासंदर्भात जे होत आहे, ते प्रत्येक कलाकारांच्या बाबतीत होतं असतं. आज गौतमी पाटील यशाच्या शिखरावर आहे. कलाकार म्हणून ती तिची कला सादर करत आहे. तो तिचा व्यवसाय आहे. यामुळे तिला अकारण ट्रोल करण्यापेक्षा तिची कुचंबणा होऊ नये, अशी काळजी घ्या, असे आवाहन अमोल कोल्हे यांनी केलं.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, अशी कला नको रे बाबा

महिलांनी आपले गुणे व कर्तृत्व दाखवायला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. मराठा समाजातच नाही तर अनेक समाजातील लोकसुद्धा पाटली आडनाव लावतात. त्यामुळे पाटील हे आडनाव नसून तो किताब आहे. कलाकारांना सुरक्षा मिळायला पाहिजे, असं मत संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मांडलं होतं. नंतर मात्र संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करुन घुमजाव केले. या कलाकाराची कला मी बघितली. आता असं वाटतंय की महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा कले ला नको रे बाबा, संरक्षण असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी आपलं विधान मागे घेतलं होतं.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -