Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी मी पाटीलच लावणार, जर... मराठा पदाधिकाऱ्यांच्या ‘त्या’ इशाऱ्याला गौतमीचं प्रत्युत्तर

मी पाटीलच लावणार, जर… मराठा पदाधिकाऱ्यांच्या ‘त्या’ इशाऱ्याला गौतमीचं प्रत्युत्तर

Subscribe

गेल्या काही महिन्यांपासून गौतमी पाटीलची जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे ती प्रचंड प्रमाणात चर्चेत असते. यावेळी गौतमी आडनावावरून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गौतमीने ‘पाटील’ आडनाव बदलून घ्यावं अन्यथा तिचे महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका एका मराठा संघटनेने घेतली. दरम्यान, माझं आडनाव जर पाटील आहे, तर मी पाटीलच लावणार ना?, असं म्हणत गौतमी पाटीलनं तिच्या कार्यक्रमावर आक्षेप घेणाऱ्यांनाही जाहीर आव्हान दिलं आहे.

एका कार्यक्रमानंतर गौतमी पाटीलला प्रसार माध्यमांनी विचारलं असता तिनं सडेतोड उत्तर दिलं. माझं आडनाव जर पाटील आहे, तर मी पाटीलच लावणार ना? असा प्रतिप्रश्नच गौतमी पाटीलनं केला आहे.

- Advertisement -

मी कार्यक्रमात कुणाचीही बदनामी करत नाही. माझा कार्यक्रम सांस्कृतिक आहे. मला कोण काय नावं ठेवतो, यानं फरक पडत नाही. ज्याला काही माझ्या कार्यक्रमावर प्रश्न असतील, त्यानं येऊन माझा कार्यक्रम पूर्ण पाहावा आणि मग बोलावं की काय चाललंय, असंही गौतमी म्हणाली.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर टीका होताना दिसत आहे. मराठा संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने गौतमी पाटीलचे कार्यक्रम महाराष्ट्रत न होऊ देण्याचा इशारा दिला आहे. गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. त्यामुळे तिनं हे आडनाव लावू नये अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा मराठा संघटनेकडून देण्यात आला आहे.

- Advertisement -

गौतमीच्या समर्थनार्थ ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी तिचं समर्थन करत एक फेसबूक पोस्ट लिहिली आहे. नावात काही आहे की नाही यावर खूप चर्चा झाली. पण आडनावात काही आहे का नाही? तर निश्चितपणे आडनावात खूप काही दडलेले असते. आडनावात वर्णश्रेष्ठतावाद आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेनुसार ब्राह्मण वर्णातील आडनाव ही ‘विद्यामय’ असावीत. क्षत्रिय वर्णियांची आडनावे ‘वीरमय’, वैश्यांची आडनावे ही ‘व्यापारमय’ असावी, तर शूद्रांची आडनावे ही ‘निंदनीय’ असावीत असे गृहीतक आहे.

‘ढोरगवार पशु शूद्र नारी सब ताडन के अधिकारी’ ही ओळ ही एका अर्थाने शूद्र स्त्रिया किंवा जनावरे यांना एकाच तराजूत तोलावे, अशा आशयाची येते. शूद्र वर्णांमध्ये बहुतांश आडनावे ही पशूंच्या नावावर दिसतात जसे डुकरे, बैले, पारवे हत्तीआंबिरे, मांजरे, निळे, हिरवे ई….!, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : Gautami Patil : गौतमीच्या समर्थनार्थ सुषमा अंधारेंची ‘पाटीलकी


 

- Advertisment -