Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र गौतमी पाटीलने घेतली उदयनराजेंची भेट, दिली 'ही' आवडती भेटवस्तू

गौतमी पाटीलने घेतली उदयनराजेंची भेट, दिली ‘ही’ आवडती भेटवस्तू

Subscribe

गौतमीने खासदार उदयनराजे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गौतमीने फक्त उदयनराजेंची भेटच नाही घेतली तर त्यांना त्यांच्या आवडीची वस्तूही भेट दिली आहे.

गौतमी पाटील ही गेल्या अनेक महिन्यापांसून चांद्यापासून ते बांद्यापर्यंत चर्चेचा विषय ठरली आहे. ‘सबसे कातील गौतमी पाटील’ तिचं हे वाक्य तर लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच तोंडपाठ झालेले आहे. ज्यामुळे राज्यात तिचे अनेक चाहते सापडतील. एखाद्या राजकीय सभेला गर्दी होणार नाही, त्यापेक्षा जास्त गर्दी ही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला होते. त्यामुळे गौतमी पाटील हिच्या संदर्भातील कोणतीही बातमी असो ती वाऱ्याच्या वेगाने तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचते. काल सोमवारी (ता. 15 मे) गौतमी पाटील हिच्याविरोधात आयोजकांकडून फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच आज लगेच गौतमीने खासदार उदयनराजे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गौतमीने फक्त उदयनराजेंची भेटच नाही घेतली तर त्यांना त्यांच्या आवडीची वस्तूही भेट दिली आहे. (Gautami Patil visited Udayanraj and gave him his favorite gift)

हेही वाचा – शोध बेपत्ता मुलींचा : अल्पवयीनांची प्रेमप्रकरणं रोखण्यासाठी हवा मुलांशी संवाद

- Advertisement -

साताऱ्यात जाऊन गौतमीने उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीनंतर तिने प्रसार माध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी ती म्हणाली की, “छत्रपती उदयनराजे यांची भेट घेतल्यानंतर खूप छान वाटलं. महाराजांची आज भेट होईल, असं मला सकाळी खरं वाटलं नव्हतं. पण अखेर खरंच भेट झाली. महाराजांचा स्वभाव खूप छान आहे. त्यांना भेटून खूप छान वाटलं. त्यांना कलाकारांची खूप जाण आहे, म्हणून मला अभिमान वाटतो.”

तसेच पत्रकारांनी गौतमीला उदयनराजेंना भेटवस्तू काय दिली? असा प्रश्न विचारला. याबाबत गौतमीने या विषयी सविस्तर माहिती देत सांगितले की, “मी महाराजांना बुके दिलं. तसेच मला माहिती मिळाली होती की, महाराजांना परफ्यूम खूप आवडतो. त्यामुळे मी आताच येता-येता परफ्यूम घेतला. आम्ही महाराजांना परफ्यूम गिफ्ट केलं आहे.”

- Advertisement -

“सातारकर माझे फेव्हरेट आहेत. माझे सातत्याने इथे कार्यक्रम असतात. मला भरभरुन प्रेम देतात म्हणून खूप छान वाटतं. असंच भरभरुन प्रेम मला देत राहा. मी आज पहिल्यांदाच महाराजांना भेटले. त्यांचा खूप चांगला स्वभाव आहे. त्यांना कलाकारांची जाण आहे. त्यांची आज अचानक भेट झाली. उदयनराजेंचा आशीर्वाद सोबत घेण्यासाठी आज सदीच्छा भेट घेतली. त्यांचा आशीर्वाद कायम सोबत राहावा, अशी मी विनंती करते,” अशी माहिती यावेळी गौतमीने प्रसार माध्यमांना दिली.

याआधीही गौतमीने प्रसार माध्यमांना मुलाखती दिलेल्या आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या कार्यक्रमासंबंधी अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. तिच्या वर्षभराच्या तारखा बूक आहेत का? असा प्रश्न तिला एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावेळी या प्रश्नाला उत्तर देत ती म्हणाली की, “नाही. माझ्या कार्यक्रमासाठी वर्षभराच्या तारख्या बूक नाही. फक्त एवढ्या महिन्याच्या तारखा बूक आहेत. पुढच्या महिन्याच्या तारखा खाली आहेत,” अशी माहिती तिच्याकडून देण्यात आली.

- Advertisment -