Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या किती घातक?

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या किती घातक?

Related Story

- Advertisement -

भारतातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर गुरुवारी स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने एकच खळबळ उडाली. कारमध्ये जिलेटिनच्या २५ कांड्या असल्याची माहिती समोर आली आहे. जिलेटीनच्या कांड्या किती घातक आहेत. या कांड्या नेमक्या कुठ्या वापरल्या जातात याची माहिती घेऊया.

स्फोटकं म्हणून जिलेटीनच्या कांड्या वापरल्या जातात. प्रामुख्याने खाणकाम, विहिर खोदणे, मोठे दगड फोडणे किंवा दगडांच्या खाणींमध्ये जिलेटीनचा वापर केला जातो. स्फोट घडवून विहिर खोदली जाते किंवा दगड फोडले जातात. कातळ फोडण्यासाठी जिलेटीनचा वापर केला जातो. विहिर खोदताना दगड, कातळ आढळं तर जिलेटीनचा स्फोट करुन ते दगड फोडले जातात. जिलेटीनच्या स्फोटाने अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे. काही महिन्यांपूर्वीच कर्नाटकातील दगडखाणीत स्फोट होऊन जागेवर ५ कामगारांचा मृत्यू झाला होता.

अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली

- Advertisement -

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला. मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल्याचं समजतं. पोलीस आणि तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचं काम सुरु आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मुंबई क्राईम ब्रांच करत आहे. लवकरात लवकर सत्य समोर येईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.


हेही वाचा –  मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी


- Advertisement -

 

- Advertisement -