घरमहाराष्ट्रपुण्यात कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जाणार - देवेंद्र फडणवीस

पुण्यात कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जाणार – देवेंद्र फडणवीस

Subscribe

पुणे मेट्रो २ साठी पाठपुरावा करु

पुण्याला पर्यावरणपूरक शहर बनवणारा मुळा-मुठाचा १००टक्के प्रोजेक्ट हा या ठिकाणी संकल्पित करण्यात आला आणि त्याला राज्य सरकारने मान्यता देऊन केंद्राची मान्यता घेऊन जापानच्या जायकाने १०० टक्के फंडिंग या प्रोजेक्टला दिला आहे. यामध्ये ११ एसटीपी तयार करायचे आहेत. पुण्यातील जे सांडपाणी नदीपात्रात जाते ते १०० टक्के घाणपाणी ट्रिट होईल. पुणे हे पहिले शहर बनेल की जे सांडपाणी ट्रिट करत आहे. याबाबतच्या निविदा काढण्यात आल्या होत्या ज्या रद्द करण्यात आल्या होत्या परंतु नव्याने निविदा काढल्या गेल्या आहेत. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आता केंद्र सरकारने देशातील सर्व नदी पुनर्जीवन प्रकल्पांकरता एक नमोमी गंगेच्या नावावर नॉर्म्स तयार केले गेले आहेत. नमोमी गंगेचे नवे टेंडर काढण्यात आले आहेत. हे टेंडर जूनपर्यंत काढण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. तसेच पुण्यातील घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी पुण्याला निधी दिला होता. पुण्यात घनकचऱ्यापासुन विद्युत निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला होता. पुढच्या तीन महिन्यात ३०० टन कचऱ्यापासून विद्युत निर्मिती सुरु होईल. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

पुण्यात या वर्षीच्या शेवटपर्यंत ६५० टन कचऱ्याचे विद्युत निर्मितीसाठी वापर केला जाईल. यासोबतच एकूण १३०० टन कचऱ्याच्या विल्हेवाटीचे प्रकल्प सुरु होईल. यामुळे मोठा बदल पुण्यात पाहायला मिळेल. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ६००० घरांचे काम सुरु आहे आणि पुढे १९,००० घरे बांधण्याचे काम पुणे महानगरपालिका हाती घेणार आहे. मेट्रोच्या संदर्भात २१ किलोमीटरचा पहिला टप्पा या वर्षी सुरु करण्यात येईल तर उर्वरित १० किलोमीटर २०२२ मध्ये सुरु करण्यात येईल.

तसेच मेट्रो टप्पा २ जवळ जवळ ६० किलोमीटरचा तयार होतोय. मेट्रो २ चा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला तर आम्ही पाठपुरावा करु तसेच तो पुढच्या बजेटमध्ये तरतूद मिळावी याकरता निश्चित प्रयत्न करु परंतु याची पुर्तता पुणे मेट्रोला करावी लागणार आहे.

- Advertisement -

पीएमपीएलमध्ये इलेक्ट्रीक बसेसमध्ये १५० बसेस आल्या डिसेंबरपर्यंत ५०० एकूण बसेस आणण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -