घरमहाराष्ट्रपुणेअवघ्या पाच हजारांत मिळताहेत लाखोंची औषधे, ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांना 'जेनेरिक'चा आधार

अवघ्या पाच हजारांत मिळताहेत लाखोंची औषधे, ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांना ‘जेनेरिक’चा आधार

Subscribe

Generic Medicines for Breast Cancer | हार्मोन पॉझिटिव्ह मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार करण्यासाठी CDK4/6 इनहिबिटरसारख्या नवीन ओरल थेरपीज उपलब्ध झाल्या आहेत. भारतात 60% पेक्षा जास्त रुग्ण हार्मोन रिसेप्टर पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर आहेत.

Generic Medicines for Breast Cancer | पुणे – महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग म्हणजे स्तनाचा कर्करोग. भारतात, दरवर्षी १.३ दशलक्षाहून अधिक कॅन्सरची नवीन प्रकरणे आढळून येतात आणि दरवर्षी ८.५ लाखांहून अधिक कर्करुणांचा मृत्यू होतो. कर्करोग ही केवळ आरोग्याची समस्या नसून ती सामाजिक, आर्थिक, विकासात्मक घटकांवरही तितकाच परिणाम करते. कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास त्यातून बरे होण्याची शक्यता जास्त असते.

जगभरात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे आणि स्त्रियांमध्ये सर्वाधिक निदान झालेला कर्करोग आणि मृत्यूचे कारण ठरत आहे. ग्लोबोकॅन २०२० नुसार भारतात दरवर्षी जवळपास १.७ लाख नवीन प्रकरणे आढळून आली आहेत त्यापैकी ९० हजार रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.

- Advertisement -

हेही वाचा योगासनांनी वाढवता येणार आता प्रजनन क्षमता, ‘हे’ आठ योगा नक्की ट्राय करा!

चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ.जयंत गावंडे सांगतात की, स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना तो बरा होण्यासाठी आणि कर्करोगातून मुक्त होण्याकरिता नवनवीन संशोधने सुरू आहेत. रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता वाढवण्याच्या उद्देशाने तोंडावाटे घेण्यात देण्यात येणारी नवीन औषधे देखील आता उपलब्ध होत आहेत. पूर्वी रुग्णांवर शस्त्रक्रियेशिवाय केवळ केमोथेरपी, रेडिएशन थेरेपी आणि हार्मोन्सवर उपचार केले जात होते. आता ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. स्तनाच्या कर्करोगाच्या व्यवस्थापनातील प्रगतीमुळे महिलांना वेळेवर उपचार मिळण्यास आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते. हार्मोन पॉझिटिव्ह मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार करण्यासाठी CDK4/6 इनहिबिटरसारख्या नवीन ओरल थेरपीज उपलब्ध झाल्या आहेत. भारतात 60% पेक्षा जास्त रुग्ण हार्मोन रिसेप्टर पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर आहेत.

- Advertisement -

भारतीय कंपन्यांनी भारतात पालबोसीक्लेब (Palbociclib) (एक CDK4/6 इनहिबिटर) ची जेनेरिक आवृत्ती सादर केली आहे. ९०,००० रुपयांच्या या औषधाचे जेनेरीक औषध ५००० रुपयांना उपलब्ध करून देण्यात आले आहे, ज्यामुळे रुग्णांना पैशांअभावी उपचार थांबवावे लागणार नाही. भारतीय रुग्णांमध्ये अधिकाधिक भारतीय जेनेरिक प्रमाणात जेनेरीक औषधांचा परिचय करुन रुग्णांना परवडणाऱ्या दरात ते औषध उपलब्घ करुन देण्याता मानस असल्याची प्रतिक्रिया डॉ. गावंडे यांनी व्यक्त केली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -