घर महाराष्ट्र 'गर्दीत ये तुला कायमचं संपवतो'; नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी, तपास सुरू

‘गर्दीत ये तुला कायमचं संपवतो’; नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी, तपास सुरू

Subscribe

खासदार नवनीत राणा यांना जीवे-मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचे फोन येत असल्यामुळे नवनीत राणा यांनी तातडीने पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली आहे.

मागच्या काही दिवसांमध्ये नेत्यांनी धमकीचे फोन येण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यावेळी खासदार नवनीत राणा यांना जीवे-मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचे फोन येत असल्यामुळे नवनीत राणा यांनी तातडीने पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली आहे. तसंच धमकी प्रकरणी तक्रार दाखल करून सदर व्यक्तीचा तातडीने शोध घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे. (Get in the crowd and you will be finished forever Death threat to Navneet Rana investigation started)

नवनीत राणा यांच्या मोबाईलवकर संपर्क साधून 16 ऑगस्टपासून विठ्ठलराव नावाची व्यक्ती त्यांनी धमकी देत होती. गर्दीच्या ठिकाणी मी कधीही धारदार चाकूने वार करणार, ते माहितीही पडणार नाही, अशा शब्दांमध्ये धमकी देत असून त्यानं अश्लिल शिवीगाळदेखील केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

- Advertisement -

अशा माथेफिरूला त्वरित जेरबंद करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी. त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी तक्रार खासदार नवनीत राणा यांच्याकडून त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. राजापेठ पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरू केला आहे.

सध्या या प्रकरणी राजपेठ पोलिसांनी भादंवि 504,506 (ब) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षीदेखील हनुमान चालिसा पठण केल्यास तुम्हाला ठार मारू, अशी धमकी नवनीत राणा यांना देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: …दोन चार महिने कांदा नाही खाल्ला तरी बिघडत नाही; दादा भुसेंच्या सल्ल्याने नवा वादंग )

- Advertisment -