घरमहाराष्ट्रबिनविरोध सरपंच निवडून आणा, नितेश राणेंकडून 50 लाखांची ऑफर; व्हिडीओ व्हायरल

बिनविरोध सरपंच निवडून आणा, नितेश राणेंकडून 50 लाखांची ऑफर; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून तो भाजपाच्या वैभवाडी कार्यालयातला असल्याचे सांगितले जात आहे. आमदार नितेश राणे यांनी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी 9 नोव्हेंबर रोजी वैभववाडी भाजपा कार्यालयात आढावा बैठक घेतली होती, याच दरम्यानचा तो व्हिडिओ असल्याचे समोर येत आहे.

सिंधुदुर्ग – भाजपा आमदार नितेश राणे (BJP Leader Nitesh Rane) यांच्याकडून भाजपाचा सरपंच निवडून आणण्यासाठी चक्क पन्नास लाख रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. वैभववाडी तालुका कार्यकर्ता आढावा बैठकीत बोलताना भाजपाची बिनविरोध ग्रामपंचायत येईल त्या गावाला 50 लाखाचा निधी देऊ अशी घोषणाच त्यांनी केली आहे. तसंच, अशी ऑफर कुठे मिळणार नसल्याचंही ते म्हणाले.

सिंधुदुर्गमध्ये भाजपचे आमदार नितेश राणे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंकडून प्रलोभनाचा प्रयत्न केला गेला असल्याचे म्हटले जात आहे. जो गाव भाजपाचा सरपंच आणि सदस्य बिनविरोध निवडून देईल त्या गावाला 50 लाख निधी देऊ असे त्यांनी जाहीर केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दिशा सालियन मृत्यूप्रकरणी सीबीआयच्या अहवालातून मोठी माहिती उघड

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची आचारसंहिता सुरू आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्ष निवडणूक रिंगणात आपली ताकद अजमावण्यासाठी तयार आहेत. आमदार नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने मोठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर वैभववाडी येथे भाजपा पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची आढावा बैठक त्यांनी घेतली होती. यावेळी कार्यकर्त्यांना या निवडणुकीत यश मिळविण्यासंदर्भात आवाहन करताना जो गाव भाजपाची बिनविरोध ग्रामपंचायत देईल, त्या गावाला 50 लाखांचा विकास निधी दिला जाईल, अशी घोषणा केल्याचे व्हिडीओमधून आता समोर आले आहे.

- Advertisement -


हेही वाचा – अशा ढोंगी हिंदूप्रवृत्तीचा मी निषेध करतो, नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका

सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून तो भाजपाच्या वैभवाडी कार्यालयातला असल्याचे सांगितले जात आहे. आमदार नितेश राणे यांनी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी 9 नोव्हेंबर रोजी वैभववाडी भाजपा कार्यालयात आढावा बैठक घेतली होती, याच दरम्यानचा तो व्हिडिओ असल्याचे समोर येत आहे.

हेही वाचा – ‘त्या’ प्रकरणी नितेश राणेंचा जामीन रद्द करा; राज्य सरकारची हायकोर्टात याचिका

बिनविरोध सरपंच निवडून आणा, नितेश राणेंकडून 50 लाखांची ऑफर; व्हिडीओ व्हायरल
Tejaswi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejaswi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -