Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र इन्स्टाग्राम, स्नॅपचॅटवर मैत्री करत न्यूड मिळवले आणि सुरू केल ब्लॅकमेलिंग; दोघांवर गुन्हा...

इन्स्टाग्राम, स्नॅपचॅटवर मैत्री करत न्यूड मिळवले आणि सुरू केल ब्लॅकमेलिंग; दोघांवर गुन्हा दाखल

Subscribe

नाशिक : इन्स्टाग्राम व स्नॅपचॅटवर अल्पवयीन मुलीशी मैत्री करत दोन तरुणांनी ब्लॅकमेल तिच्या न्यूड फोटो, पैसे मागत शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

त्यानुसार पोलिसांनी संशयित अर्थव शहाणे (वय २२, रा. औरंगाबाद), सुहास जितेंद्र सराफ (२५, रा. लक्ष्मीनारायण निवास, सरस्वतीनगर, पंचक, नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अर्थव व सुहास हे पीडित मुलीच्या ओळखीचे आहेत. त्यांची इन्स्टाग्राम, स्नॅपचॅटवर मैत्री झाली. दोघांनी तिच्याशी ओळख वाढवत मैत्री केली. त्यातून दोघांनी तिच्याकडे न्यूड फोटोची मागणी करत ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच, तिच्याकडे पैसे व शरीरसुखाची मागणी केली. ही घटना १ मे २०२२ ते १० मे २०२३ या कालावधीत प्लॅट क्र.१०३, स्पेस रोहिणी वन, पहिला मजला, कृष्णा सिल्क साडीच्यामागे, अशोकस्तंभ, नाशिक येथे घडली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण करीत आहेत.

सलूनमध्ये महिलेला मारहाण

- Advertisement -

सलूनमध्ये एका कर्मचार्‍या सहकारी महिला कर्मचार्‍याला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना युनिसेक्स सलून, सोनी डिझायनरजवळ, विसेमळा, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे घडली. याप्रकरणी पीडित महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित निरंजन किशोर शिंदे (वय २५, रा. नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला व संशयित निरंजन शिंदे हे युनिसेक्स सलूनमध्ये कामास आहेत. संशयित निरंजन याने महिलेला अश्लिल हावभाव करून शिवीगाळ व मारहाण केली. त्याने महिलेचा मोबाईल फोडून नुकसान केले. पुढील तपास पोलीस हवालदार मोळोदे करीत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -