Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुणे पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून गिरीश बापट यांच्या सूनबाई इच्छुक; म्हणाल्या...

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून गिरीश बापट यांच्या सूनबाई इच्छुक; म्हणाल्या…

Subscribe

"पक्ष जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल. पोटनिवडणुकीत भाजप जिंकेल यांची जबाबदारी घेऊ", असा विश्वास स्वरदा बापट यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई | पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची (Pune Lok Sabha bypoll election) जागा रिक्त झाली आहे. ही पोटनिवडणुक लढण्यासाठी भाजपसह महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) अनेक नेत्यांनी दावा केला आहे. यात गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट (Swarda Bapat) यांनी लोकसभा पोटनिवडणूक लढण्याच इच्छुक असल्याचे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनशी बोलताना सांगितले. यापूर्वी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने स्वर्गीय आमदार मुक्ता टिळक यांच्या घरात उमेदवारी न दिल्याने लोकांमध्ये नाकराजी पसरली होती, याचा फटका भाजपला बसला होता. यामुळे भाजप पुन्हा बापट यांच्या कुटुंबियांना उमेदवारी देणार की पक्षा अंतर्गत कोणाला उमेदवारी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

“पक्षा जी जबाबदारी देईल, ती आम्ही पार पाडू. यामुळे पक्ष जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल. पोटनिवडणुकीत भाजप जिंकेल यांची जबाबदारी घेऊ”, असा विश्वास स्वरदा बापट यांनी व्यक्त केला आहे. “बाबांच्या राहिलेल्या कामांसाठी मी असेल किंवा इतर कोणताही उमेदवार असेल, आम्ही प्रयत्नशील राहू. मी सद्या पक्षात शहर उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे. तसेच सांगलीत नगरसेविका म्हणून देखील काम केलेले आहे. भाजप युवा मोर्चामध्ये काम केले असून पक्षाने दिलेली सर्व जबाबदारी पार पाडत आलेली आहे. त्यामुळे पक्ष माझा कसा विचार केले हे पक्ष नेतृत्व ठरवतील. जर पक्षाने मला खासदार होण्याची जबाबदारी दिली, तर मी ती ही पार पडेन”, असे स्वरदा बापट म्हणाल्या.

- Advertisement -

“ही पोटनिवडणूक होणार नाही, असे माझे मत आहे. पण, यावर पक्षच निर्णय घेईल, तो निर्णय आम्हाला मान्य असेल. बाबांचे अपूर्ण काम पुढे नेण्याची मोठी जबाबदारी आमच्यावर आहे. ही जबाबदारी मी पार पाडण्याची नक्कीच प्रयत्न करेन. सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर उद्या काय होईल?, कोणी सांगू शकत नाही”, असेही स्वरदा बापट म्हणाल्या.

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -