घरमहाराष्ट्रनागपूरGirish Mahajan : पार्टनर वाढले की खाती बदलतात; महाजनांनी फडणवीसांसमोरच व्यक्त केली...

Girish Mahajan : पार्टनर वाढले की खाती बदलतात; महाजनांनी फडणवीसांसमोरच व्यक्त केली खंत

Subscribe

नागपूरमध्ये सोमवारी (29 जानेवारी) खासदार औद्योगिक महोत्सव समापन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.

नागपूर : आमच्याकडे मित्र वाढले, पार्टनर वाढले की, मग खाती बदलतात. त्यांच्या मागणीप्रमाणे खाती बदलतात. त्यामुळे ती मोठी अडचण झालेली आहे, असं मोठं विधान भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. तेसुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच. तेव्हा भाजपचे संकट मोचक म्हणून ओळख असलेले मंत्री गिरीश महाजन नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. (Girish Mahajan Accounts change when partners grow Mahajan expressed his regret in front of Fadnavis)

नागपूरमध्ये सोमवारी (29 जानेवारी) खासदार औद्योगिक महोत्सव समापन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

शिवसेनेत बंड करून सत्तेत सहभागी झालेले मुख्यमंत्र एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीत बंड करून अजित पवारही त्यांच्या समर्थक आमदारांसह महायुतीत सहभागी झाले. भाजप सत्तेत जरी असले तरी त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार गट आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या समर्थक आमदारांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागत आहेत. यामुळेच भाजपमधील निष्ठावान लोकप्रतिनिधी कुठेतरी मागेच राहत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत असतानाच भाजपचे संकट मोचक आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची खंत बोलून दाखवली.

हेही वाचा : Kishori Pednekar ED Enquiry : किशोरी पेडणेकरांसह संदीप राऊत यांची आज ईडी चौकशी

- Advertisement -

काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन?

नागपुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, इतक्या मोठ्या नावाजलेल्या कंपन्या नागपुरातील आहेत हे मलाही माहिती नव्हतं. पर्यटनाला इंडस्ट्री म्हणून बघितलं पाहिजे. पूर्वी राज्यांमध्ये आपण दोन नंबरवर होतो. आता नऊव्या, दहाव्या नंबरवर आहोत. आपल्यापुढे काश्मीर, केरळ, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश पुढे जात आहेत. विदर्भात फॉरेस्ट आहे. अनेक पर्यटनस्थळ आहेत. तरीसुद्धा आपण मागे आहोत याचा विचार करण्याची गरज आहे. माझ्याकडे 3 सेक्रेटरी बदललेले आहेत. त्यामुळे कसं काम करावं हे मला कळत नाही. तीन वर्षात तिसऱ्यांदा मंत्री झाले आहे. अडचणी भरपूर आहेत. अजून सात-आठ महिने हे खातं माझाकडे ठेवलं तर मला काहीतरी करता येईल, असं मला वाटतं, असं म्हणत गिरीश महाजन यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा : Weather Update : हवामान विभागाने थंडीबाबत दिला ‘हा’ इशारा

फडणवीसांनी केली तत्काळ नाराजी दूर

मंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच मंचावर गिरीश महाजन यांची तेथेच नाराजी दूर केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गिरीश महाजन तुम्ही चिंता करू नका. पुढच्या काळात तुमच्या खानदेशामध्ये सुद्धा हा कार्यक्रम नितीन गडकरी करतील.आता तुम्हीच कायमस्वरुपी पर्यटन मंत्री आहात. त्यामुळे तुम्हाला उत्तर महाराष्ट्रात, विदर्भात जिथे वाटते तिथे पर्यटन वाढवा. आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना दिलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -