घरमहाराष्ट्रभाजपला जागा तर निवडून आणायचीय... सत्यजित तांबेंच्या पाठिंब्यावर महाजनांची प्रतिक्रिया

भाजपला जागा तर निवडून आणायचीय… सत्यजित तांबेंच्या पाठिंब्यावर महाजनांची प्रतिक्रिया

Subscribe

मंत्री गिरीष महाजन म्हणाले, सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितला तर देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे योग्य तो निर्णय घेतील. आम्हाला जागा तर निवडून आणायची आहे. त्यामुळे लवकरच यावर निर्णय होईल. आमच्याकडे उमेदवारांची रांग होती. देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मनात काहीतरी वेगळी रणनिती असेल. 

पुणेः नाशिकची जागा भाजपला निवडून आणायची आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे बंडखोर व अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपने पाठिंबा द्यावा की नाही याचा निर्णय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे घेतील, असे मंत्री गिरीष महाजन यांनी स्पष्ट केले.

मंत्री गिरीष महाजन म्हणाले, सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितला तर देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे योग्य तो निर्णय घेतील. आम्हाला जागा तर निवडून आणायची आहे. त्यामुळे लवकरच यावर निर्णय होईल. आमच्याकडे उमेदवारांची रांग लागली होती. देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मनात काहीतरी वेगळी रणनिती असेल.

- Advertisement -

भाजप घर फोडण्याचे काम करत आहे या नाना पटोले यांच्या आरोपवर महाजन म्हणाले, तुम्हाला तुमचे घर सांभाळता येत नाही. तुमच्या घरातले सर्व बाहेर पडत आहे. उद्या नाना एकटेच राहतील, अशी शंका आहे. मात्र पटोले पण ईकडे तिकडे जात असतात. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये कोण शिल्लक राहिल असा प्रश्न आहे. कॉंग्रेसचे राम भरोसे सुरु आहे, असा टोला मंत्री महाजन यांनी मारला.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नाशिकमधून डॉ. सुधीर तांबे यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज भरलाच नाही. त्यानंतर त्यांचा मुलगा सत्यजित तांबेने अपक्ष म्हणून निवडणुकीसाठी अर्ज भरला. त्यामुळे डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली. ती मागणी मान्य झाल्याने डॉ. सुधीर तांबे यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले.

- Advertisement -

सोमवारी निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने सत्यजित तांबे निवडणूक अर्ज मागे घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्याचवेळी कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी सत्यजित तांबे यांचे निलंबन करण्याची सूचना केली. त्यानंतर सत्यजित तांबे यांनी त्यांच्या सोशल मिडिया हॅंडलवरून कॉंग्रेसचा उल्लेख काढून टाकला. कॉंग्रेस सत्यजित तांबे यांना पक्षातून काढणार की सत्यजित तांबे स्वतः कॉंग्रेस सोडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -