ठाणे : भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी भेट दिली. मात्र त्यांच्या या भेटीमध्ये राजकीय चर्चेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच महाजन देवेंद्र फडणवीस यांचा कोणता संदेश देणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. मात्र या चर्चेला आता गिरीश महाजन यांनी पुर्णविराम दिला असून मी फक्त एकनाथ शिंदेंना त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो असे माध्यमांना सांगितले आहे. तसेच महायुतीमध्ये सारं काही आलबेल असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे. (Girish Mahajan ON CM Eknath Shinde.)
हेही वाचा : Nitin Gadkari: राजकारणात प्रत्येकाला मोठ्या पदाचा हव्यास; राजकीय नेत्यांबद्दल काय म्हणाले गडकरी?
गेल्या दोन दिवसापासून एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसून ते आरामासाठी त्यांच्या साताऱ्यातील दरेगावात मुक्कामी होते. तिथे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतले. त्यानंतर ते मुंबईत आले आहेत. पण त्यांची प्रकृती अद्याप ठीक नसल्याने त्यांची शिवसेना नेत्यांसोबतची आजची बैठक देखील पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. या सर्व घडामोडींदरम्यान गेल्या दोन-तीन दिवसात एकाही भाजपा नेत्याने शिंदेंची भेट घेतली नव्हती. त्यानंतर आज भाजपाचे नेते गिरीश महाजन त्यांनी शिंदेंची भेट घेतली आहे. तसेच ही भेट फक्त त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच आमच्या महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे. तसेच आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.
हेही वाचा : Raigad News : प्रबळगडावरील दारुपार्ट्या कधी बंद होणार, प्रबळगड दुर्ग संवर्धन समिती मोठे पाऊल उचलणार
तसेच आमच्यात खातेवाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच कोणत्याच राजकीय विषयांवर आमची चर्चा झाली नसल्याचे यावेळी स्पष्ट सांगितले आहे. तसेच पाच तारखेची तयारी जोरदार सुरू आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी यांनी आझाद मैदानाला अचानक भेट दिली होती. आम्ही उद्या सर्व आझाद मैदानाची पाहणी करणार आहोत, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच शपथविधीचा कार्यक्रम हा दिमाखदार पार पडणार आहे. दिल्लीतील बैठकीसंदर्भात कोणीतीही माहिती माझ्याकडे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच अजित पवार दिल्लीला गेले याबाबत काहीच माहिती नाही, अशा अनेक गोष्टींवर त्यांनी आज माध्यमांशी बोलताना भाष्य केले आहे.
Edited By Komal Pawar Govalkar