घरमहाराष्ट्रगप्प बसा, अन्यथा पंचायत होईल; गिरीश महाजनांचा ए.टी. पाटलांना दम

गप्प बसा, अन्यथा पंचायत होईल; गिरीश महाजनांचा ए.टी. पाटलांना दम

Subscribe

खान्देशात भाजपातील अंतर्गत वाद विकोपाला जाताना दिसत आहे. भाजपने जळगाव मतदारसंघाचे तिकीट विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांना न देता स्मिता वाघ यांना दिले आहे. त्यामुळे ए. टी. पाटलांची तळपायाची आग मस्तकात शिरली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी गिरीश महाजनांवर सडकून टीका केली होती. या टीकेला आता महाजनांकडून प्रत्युत्तर दिले गेले आहे.

ए. टी‌ पाटील यांनी गप्प बसावं, अन्यथा मी बोललो तर त्यांची पंचायत होईल, असा दम जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव मतदारसंघाचे विद्यमान खासदार ए. टी. पाटीलांना दिला आहे. धुळे मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. बुधवारी ए. टी. पाटील यांनी पारोळा येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात गिरीश महाजन आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यावर सडकून टीका केली होती‌. वाघ आणि महाजन यांनी मिळून माझे तिकीट कापले, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. याच आरोपांना महाजनांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले महाजन?

आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच पक्षाकडून आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यावेळी भाजपने जळगावचे विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना दिले आहे. त्यामुळे ए. टी. पाटलांची तळपायाची आग मस्तकात शिरली आहे. तिकीट न मिळालाच्या क्रोधातून त्यांनी पारोळा येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यात त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली. या कार्यक्रमात भाजपचे काही पदाधिकारी, नगरसेवक, माजी आमदार, कार्यकर्ते उपस्थित होते. पाटलांचे तिकीट कापल्यामुळे खान्देशात भाजच पक्षातच दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. यातूनच भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. दरम्यान, ए.टी. पाटलांनी महाजनांवर गंभीर आरोप केले आहेत. मी मराठा समाजाचा असल्यामुळे माझं तिकीट कापलं असे पाटील म्हणाले आहेत. यावर गिरीश महाजन यांनी पाटलांना गप्प बसण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर मी जर तोंड उघडलं तर ए. टी. पाटील अडचणीत येतील, असे महाजन म्हणाले आहेत.

- Advertisement -

‘ए. टी. पाटलांनी पक्षाविरोधी भूमिका घेऊ नये’

दरम्यान, उदय वाघ यांनीदेखील ए. टी. पाटलांना पक्षाविरोधात भूमिका न घेण्याचे आवाहन केले आहे. एका स्थानिक न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत वाघ म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मतदारसंघातील जनता समजूतदार आहे. त्यामुळे पाटील यांनी पक्षाविरोधात भूमिका घेऊ नये.


हेही वाचा – ए. टी. नाना भडकले, महाजनांवर घणाघात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -