घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकन्येने केले ६० वर्षीय पित्याचे ‘शुभमंगल’

कन्येने केले ६० वर्षीय पित्याचे ‘शुभमंगल’

Subscribe

40 वर्षीय महिलेची वृद्धाशी जुळली रेशीमगाठ; ग्रामस्थांनी अनुभवाला अनोखा विवाह

आजोबांच्या पत्नीचे वर्षभरापूर्वी निधन झाले. मुलीचा विवाह झाल्याने ती सासरी गेली. त्यामुळे आजोबांच्या वाट्याला एकटेपण आले. वडिलांना आधाराची गरज ओळखून मुलीने ६० वर्षीय वडिलांचे लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि अंमलताही आणला. मुलीने ४० वर्षीय महिलेशी वडिलांचा विवाह लावला. हा आगळा वेगळा विवाह संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकुर नजीकच्या शिंदोडीच्या ग्रामस्थांनी अनुभवला. आता या लग्नाचे सगळीकडेच चर्चा होत आहे.

शिंदोडी येथील ६० वर्षीय तबाजी चिमाजी कुदनर यांच्या पत्नीचे एक वर्षापूर्वी हृदयविकाराच्य धक्क्याने निधन झाले. त्यानंतर त्यांच्या मुलगी हिचे सरिता बाचकर यांचे लग्न झाले. त्यामुळे घरामध्ये ते एकटेच राहिले. त्यातून त्यांच्या खाण्या पिण्याचे, कपडे धुण्याचे राहण्याचे हाल होत होते. त्यांची शेती व जनावरे संभाळण्याची ताकद त्यांची कमी होत चालली होती. अखेर त्यांच्या मुलीने व मित्रपरिवाराने त्यांना लग्न करण्याचा त्यांना सल्ला दिला. सुरुवातीला आजोबांनी समाज काय म्हणेल, हे काय लग्नाचे वय आहे का, असे लग्नास नकार दिला. शेवटी मुलगी आणि मित्रपरिवाराच्या आग्रहखातर त्यांनी लग्नास होकार दिला. मित्रांनी आणि मुलीने नात्यातीलच शिंगवे (ता.राहुरी) येथील ४० वर्षीय सुमनशी कुदनर यांचे लग्न मोजक्याच नातएवाईकांच्या उपस्थितीत लावून दिले. लग्न मला एकटेपणा आणि मुलगी व मित्रपरिवाराच्या आग्रहामुळे करावे लागले, असे तबाजी कुदनर यांनी सांगितले. तर आईवडिलांच्या इच्छेनुसार व माझ्या स्वखुशीने हे लग्न केले आहे. मी या लग्नापासून आनंदित आहे, असे सुमन हिने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -