घरमहाराष्ट्रभिवंडीत ईदनिमित्त चक्री पाळण्यात खेळायला गेलेल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

भिवंडीत ईदनिमित्त चक्री पाळण्यात खेळायला गेलेल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

Subscribe

रमजान ईद म्हंटल की लहानग्यांची चंगळ, घरातील वडीलधाऱ्यांकडून, नातेवाईकांकडून मिळालेल्या ईदी रुपी बक्षिस रक्कमेतून आनंदमेळ्यात चक्री पाळण्यात खेळण्यासाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलीचा चक्री पाळण्यातून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुस्कान मोहम्मद शमीम सिद्दीकी असे मयत मुलीचे नाव असून या अपघाताच्या दुर्दैवी घटनेनंतर चक्री पाळणा चालक पसार झाला आहे.

रमजान ईद म्हणजे मुस्लिम धर्मीयांची जणू दिवाळी.. खास करुन लहान मुले-मुली नवीन कपडे घालून या सणाचा आनंद घेत असताना. लहान मुलांना मोठ्यांकडून ईदीच्या रुपाने बक्षिसी रक्कम मिळते. मग ही रक्कम घेऊन लहानग्यांचा मोर्चा वळतो तो खाऊ खाण्याकडे आनंद मेळ्यात खर्च करण्याकडे जास्त आकर्षण असते.

- Advertisement -

Girl Death In Accident Photo Muskan [ Mayat ]
चक्री पाळण्यातून पडून मृत्यूमुखी पडलेली मुलगी
भिवंडी शहरातील रामेश्वर मंदीर परीसरातील झोपडपट्टीत राहणारी मुस्कान मो. शमीम सिद्दीकी ही नऊ वर्षांची मुलगी आपल्या चुलत बहिणींसोबत समदनगर बगीचा येथील आनंद मेळ्यात दुपारी एक वाजता गेली. तेथील हाताने फिरविल्या जाणाऱ्या चक्री पाळण्यात ती बसल्यावर ती वर गेली. वर गेल्यानंतर घाबरल्यामुळे तिचा तोल गेला आणि ती खाली पडत असताना पाळण्यातील इतर दालनावर आदळून तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. ती जखमी रक्ताच्या थारोळ्यात पडली असता चक्री पाळणा चालविणाऱ्याने तेथून पलायन केले.

या दुर्घटनेनंतर मुलांनी घरी येऊन मुस्कानच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली. पालकांनी घटनास्थळी धाव घेत आपल्या जखमी मुस्कानला स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारा करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ती मयत झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. चक्री पाळणा चालकाने खबरदारी घेत तात्काळ पाळणा थांबविला असता अथवा तिला वैद्यकीय मदत उपलब्ध करुन दिली असती तर आपली मुलगी बचावली असती. तिच्या मृत्यूस पाळणा चालकाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप मुस्कानचे वडील मोहम्मद शमीम सिद्दीकी यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -