घरताज्या घडामोडीPune Crime News : पुण्यात प्रेयसीनं प्रियकराला संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Pune Crime News : पुण्यात प्रेयसीनं प्रियकराला संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Subscribe

दिल्लीत एका २० वर्षीय तरुणाने अल्पवयीन तरुणीची हत्या केल्याची बातमी घडल्यानंतर पुण्यात सुद्धा असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यात प्रेम प्रकरणातून एका प्रेयसीने प्रियकराची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील वाघोली या परिसरात घडली आहे. पोलिसांनी या घटनेची तपासणी केली असता, या हत्येमागील धक्कादायक कारण समोर आलं आहे. तसेच या प्रकरणात हत्या करणाऱ्या प्रेयसीला अटक करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रेयसी आणि प्रियकराचं नाव अनुजा आणि यशवंत आहे. हे दोघेही एकमेकांना ओळख होते. मात्र यशवंत हा तिला सारखा त्रास देत होता आणि तिच्यावर संशय घेत होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाले. हे वाद इतके टोकाला गेले की, प्रेयसीने प्रियकरावर भाजी कापण्याच्या चाकूने वार करुन हत्या केली होती. अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. प्रियकराची हत्या केल्यानंतर तिने देखील स्वत:च्या हाताची नस कापून घेतली होती. मात्र, वसतिगृहातील मुलांमुळे तिचा जीव वाचला. दोघेही वाघोलीतील रायसोनी महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सच्या द्वितीय वर्षात शिकत होते.

- Advertisement -

अनुजा आणि यशवंत यांच्यात प्रेमसंबंध होते. गेल्या एक वर्षांपासून सोबत होते. यशवंत हा तिच्यावर संशय घेत तिला मानसिक त्रास देत होता. तिच्यावर अनेक बंधनं देखील आणत होता. त्यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद होत होते. पण यशवंत राहत असलेल्या वसतिगृहात ती अभ्यासासाठी गेली होती. पण पहाटेच्या सुमारास त्यांच्यात जोरात भांडण झाले आणि त्या भांडणात अनुजाने यशवंतची हत्या केली. दरम्यान, या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

दिल्लीतही घडला धक्कादायक प्रकार 

नवी दिल्लीतील शाहबाद डेअरी या परिसरात एका 20 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीला 40 वेळा चाकूने भोसकले आणि नंतर तिला दगडाने ठेचून मारले (Delhi Sakshi Murder Case). गजबजलेला परिसर असतानाही रस्त्याने जाणाऱ्यांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. या निर्घृण हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणातील आरोपीने दिल्ली पोलिसांनी आरोपीला बुलंदशहर येथून अटक केली. त्याने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला असून आपल्याला या कृत्याबद्दल अजिबात पश्चाताप नसल्याचे त्याने सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : Delhi Sakshi Murder Case : मला अजिबात पश्चाताप नाही…, आरोपीची पोलिसांकडे कबुली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -