Homeमहाराष्ट्रAmbedkar on EVM : शेवटच्या तासातील प्रत्येक बुथवरील मतदानाची आकडेवारी द्या; आंबेडकरांची...

Ambedkar on EVM : शेवटच्या तासातील प्रत्येक बुथवरील मतदानाची आकडेवारी द्या; आंबेडकरांची नेमकी मागणी काय

Subscribe

विधानसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर संध्याकाळी सहा वाजल्यानंतर 76 लाख मतदान झाल्याचे म्हटले आहे. जर एवढे मतदान झाले असेल तर सायंकाळनंतर प्रत्येक बुधवर किती मतदारांना टोकन वाटले याची आकडेवारी आणि त्याची व्हिडिओ क्लीप द्या, अशी मागणी वंचित बहुन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

मुंबई : विधानसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर संध्याकाळी सहा वाजल्यानंतर 76 लाख मतदान झाल्याचे म्हटले आहे. जर एवढे मतदान झाले असेल तर सायंकाळनंतर प्रत्येक बुधवर किती मतदारांना टोकन वाटले याची आकडेवारी आणि त्याची व्हिडिओ क्लीप द्या, अशी मागणी वंचित बहुन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. दरम्यान, वंचितने ईव्हीएमविरोधात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सर्वच राजकीय पक्षांना सहभागी होण्यासाठी आवाहन करणार असून त्यांची एक बैठक घेणार असल्याची माहितीही आंबेडकर यांनी दिली. (give each polling booth statistics for the last hour; what is prakash ambedkar’s exact demand?)

विधानसभा निवडणुकीतील अनपेक्षित पराभवाने सर्वच राजकीय पक्षांनी पराभवाचे खापर निवडणूक आयोग तसेच ईव्हीएमवर फोडले आहे. वंचित बहुजन आघाडीनेही ईव्हीएमविरोधात राज्यभर आंदोलनाला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर शंका उपस्थित केली.

हेही वाचा – Solapur Police : एसी डब्यातून तस्करी; पोलिसांनी विशाखापट्टणम एक्सप्रेसमधून जप्त केला 35 किलो गांजा

या मतदानासंदर्भात आपण निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार केला होता. पण त्याला काहीच उत्तर मिळालेले नाही. विधानसभा मतदारसंघातील रिटेनिंग अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्राला काहींनी उत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर महाराष्ट्रात सायंकाळी सहा नंतर 75 लाख मतदान झाल्याचे सांगण्यात आले आहे. कायद्यानुसार 5.59 मिनिटे झाली की मतदान प्रक्रिया थांबवावी लागते. मतदान केंद्राचे दरवाजे बंद करावे लागतात, जे आतमध्ये आहेत त्यांना टोकन दिले जाते आणि ज्याच्याकडे टोकन आहे त्यालाच मतदानाच अधिकार दिला जातो. संबंधित मतदान केंद्रावरील प्रिसाइडिंग अधिकाऱ्याने ही सर्व कार्यवाही करायची असते. त्यानेच या सर्व नोंदी ठेवायच्या असतात.

निवडणूक आयोग सायंकाळनंतर 75 लाख मतदान झाल्याचे मान्य करीत असेल तर 20 तारखेला सायंकाळी 6 नंतर प्रत्येक बुधनुसार किती मतदान झाले त्याची आकडेवारी द्या. जे रांगेत होते त्यांना मतदान केंद्रनिहाय किती टोकन दिले? कुठल्या अधिकाऱ्यामार्फत हे टोकन दिले? जे टोकन दिले त्याचे व्हिडिओ क्लीप द्या, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

हेही वाचा – Allu Arjun Bail Granted : अल्लू अर्जुनला वाचवण्यासाठी वकिलांकडून शाहरुखच्या जुन्या केसचा दाखला


Edited by : Ashwini A. Bhatavdekar