घरताज्या घडामोडीकलाग्राम, येवला शिवसृष्टी प्रकल्पासाठी वाढीव निधी द्या

कलाग्राम, येवला शिवसृष्टी प्रकल्पासाठी वाढीव निधी द्या

Subscribe

माजी खासदार समीर भुजबळ यांनी घेतली पर्यटनमंत्र्यांची भेट

नाशिकमधील कलाग्राम प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकरकमी आठ कोटी निधी तर येवला शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वाढीव निधी देण्यात यावा अशी मागणी माजी खासदार समीर भुजबळ यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. समीर भुजबळ यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन या प्रकल्पाबाबत चर्चा केली.

नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळावी तसेच पर्यटनाचा विकास व्हावा व पर्यटकांना शहरात अधिकाधिक वेळ घालविता यावा यासाठी एम.टी.डी.सी.कडून ’ दिल्ली हाटच्या धर्तीवर नाशिक शहरात गोवर्धन येथे सन २०१४ मध्ये कलाग्राम उभारण्याचे काम हाती घेण्यात आले . सद्यस्थितीत या प्रकल्पाचे बांधकाम अंतिम टप्प्यात येऊन पुरेशा निधी अभावी बंद पडले आहे. या बाजारपेठेत आदिवासी बांधवानाही त्यांच्या कलेचे प्रदर्शन करता येईल तसेच त्यांच्या हस्तकलेतून विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्याची त्यांना संधी मिळणार आहे. तर येवला शहराच्या लौकिकात व पर्यटनात भर पाडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनपटावर आधारित शिवसृष्टी प्रकल्पास चार कोटी रूपये निधीची मान्यता प्राप्त आहे. या निधीत शिवसृष्टी प्रकल्प पुर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे हा प्रकल्प पुर्ण होण्यासाठी अधिक रकमेची आवश्यकता असून जिल्हाधिकार्‍यांनी तसा प्रस्ताव शासनास सादर केला असून सदर प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देवून निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -