घरमहाराष्ट्रधर्मांतराच्या घटनांवर कारवाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सुचना देणार, शंभुराज देसाईंची माहिती

धर्मांतराच्या घटनांवर कारवाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सुचना देणार, शंभुराज देसाईंची माहिती

Subscribe

नगर जिल्ह्यातील धर्मांतरच्या मुद्द्यावरून आज आमदार राम सातपुते विधानसभेत चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले, नगरच्या राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी गावात ख्रिश्चन मशीनरींकडून धर्मांतरची घटना घडली. या घटनेवरून लक्ष्यवेधी सूचनेतून महाराष्ट्र धर्मांतरविरोधी कायदा आणणार का? असा सवाल राम सातपुते यांनी केला. यावर राज्यातील धर्मांतर घटना रोखण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे म्हणत अशा घटनांवर कारवाई करण्यासाठी गावपातळीवर जिल्हाधिकाऱ्यांना सुचना देणार असल्याचे शंभूराज देसाईंनी जाहीर केले आहे.

या घटनेवर बोलताना शंभुराज देसाई म्हणाले की, राहुरीमध्ये हिराबाई हरेल त्यांच्यावर कलम सिंग नावाच्या व्यक्तीने दबाव टाकून त्यांचे धर्मांतर केले. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र या प्रकरणाची तातडीने दखल घेत कारवाई करणे अपेक्षित होते, मात्र पाच महिने झाले आरोपी सापडत नाही, आरोपीला अटकपूर्व जामीन मिळाला, या प्रकरणात अधिकाऱ्याची दिरंगाई झाली, त्या अधिकाऱ्याची पंधरा दिवसांच्या आत चौकशी केला जाईल. जर संबंधित अधिकारी दोषी आढळला तर कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, या प्रकरणात हलगर्जीपणा करणारे पोलीस अधिकारी प्रताप दराडे यांना पोलीस स्टेशनमध्ये ठेवणं योग्य नाही, त्यांना आजच्या आज जिल्हा नियंत्रण कक्षाला हलवलं जाईल आणि पंधरा दिवसांच्या आत अॅडीशनल एसपीमार्फत चौकशी करत पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

- Advertisement -

धर्मांतरणासाठी कायद्याने कोणतीही परवानगी नाही. गावपातळीवर पोलीस पाटील, पोलीस बीट अंमलदार यांना सतर्क करणे आणि अशा गोष्टी कोणी करत असेल तर त्यावर लक्ष ठेवून वरिष्ठांना त्याबाबत सुचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या जातील, असेही शंभूराज देसाई म्हणाले.


उमेश कोल्हे हत्या प्रकरण : उद्धव ठाकरेंच्या फोनची होणार चौकशी, शंभूराज देसाईंची घोषणा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -