घरमहाराष्ट्र'दुष्काळ परिस्थितीत पाण्याला, गुरांना चाऱ्याला प्राधान्य द्या'

‘दुष्काळ परिस्थितीत पाण्याला, गुरांना चाऱ्याला प्राधान्य द्या’

Subscribe

नंदुरबार तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत गावकर्‍यांना पिण्याचे पाणी, गुरांना चारा आणि बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामसेवक तसेच तलाठी यांनी प्रथम प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या.

नंदुरबार तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत गावकर्‍यांना पिण्याचे पाणी, गुरांना चारा आणि बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामसेवक तसेच तलाठी यांनी प्रथम प्राधान्य द्यावे, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून ग्रामसेवक – तलाठी यांनी नेमून दिलेल्या गावातच रहावे, जे गावात राहणार नाहीत अशांवर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज, २७ नोव्हेंबर रोजी दिल्या.

आयोगाचा निधी पाणीपुरवठा योजनांसाठी वापरावा

पंचायत समिती सभागृहात नंदुरबार तालुक्यातील पाणी टंचाई, गुरांना चारा, रोजगार हमी आणि प्रधानमंत्री आवास योजनांच्या कामांची प्रगती याबाबत जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, ‘पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती पहात ग्रामसेवक आणि तलाठ्यांनी १४ व्या वित्त आयोगाचा निधी पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी वापरावा, त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे, अशा ठिकाणी वैरण विकास कार्यक्रमांअतर्गत चारा लागवड करावी, एक रुपये भाडे तत्वावर जमीन उपलब्ध करुन दिली जाईल,’ असेही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

जिल्ह्याला २५ पॉकलेड यंत्र मिळाले

डॉ. कलशेट्टी पुढे म्हणाले की, ‘दुष्काळाचा सामना करण्यासाठी पाणी फाऊंडेशनमध्ये सर्व गावांचा समावेश करण्यासाठी ग्रामसेवक आणि तलाठ्यांनी ग्रामपंचायतींना प्रवृत्त करावे, लोकसभागाशिवाय कुठलेही कामे पूर्ण होत नाही यासाठी गावकर्‍यांचा सहभाग महत्वाचा राहणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले आपल्या जिल्ह्याला २५ पॉकलेड यंत्र मिळाले असून या पॉकलेंड यंत्रांचा वापर परिसरातील तलावातून गाळ काढण्यासाठी होणार आहे. तरी या पॉकलॅड यंत्रणाचा अधिकाधिक वापर करुन भविष्यातील दुष्काळावर मात करता येईल यासाठी गांवकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -