घरमहाराष्ट्रपुणेलोकसभा निवडणुकीत फडणवीसांना पुण्यातून तिकीट द्या, ब्राह्मण महासंघाची नड्डांकडे मागणी

लोकसभा निवडणुकीत फडणवीसांना पुण्यातून तिकीट द्या, ब्राह्मण महासंघाची नड्डांकडे मागणी

Subscribe

पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीत समावेश झाला आहे. त्यामुळे येत्या दिवसांत फडणवीस केंद्रीय मंत्रिमंडळातही दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना येत्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून तिकिट देण्याची मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. (Give ticket to Fadnavis from Pune in Lok Sabha elections, Brahmin federation demands to Nadda)

देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच केंद्रीय नेतृत्त्वाचा शब्द पाळला आहे. मी भाजपामुळे आमदार होऊ शकलो आणि मुख्यमंत्री पदी विराजमान होऊ शकलो, असं नागपूरच्या भाषणात देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तसेच, राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारीही केंद्रीय नेतृत्त्वानेच दिल्याने ती स्वीकारली असल्याचं फडणवीसांनी कबूल केलं होतं. दरम्यान, आता त्यांची नियुक्ती भाजपाच्या निवडणूक समितीत झाल्याने ते लवकरच केंद्रात दिसतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसंच, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजपाचे राष्ट्रीय जे.पी.नड्डा यांना पत्र लिहून एक मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातील लोकसभेची तिकीट द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – हर घर जल योजना! देशातील ‘या’ राज्यात अडीच लाखांहून अधिक घरांमध्ये नळाद्वारे पाणी

कुलकर्णी यांनी पत्रात म्हटलं आहे की,”पुण्यातील ब्राह्मण महासंघाने आतापर्यंत २००९ मध्ये काँग्रेसचे सुरेश कलमाडी, २०१४ मध्ये अनिल शिरोळे आणि २०१९ मध्ये गिरीश बापट यांना पाठिंबा दर्शवला होता. हे सर्व जिंकून आले होते. त्यामुळे सध्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस हे अतिशय हुशार आणि कुशाग्र बुद्धीमत्ता असलेले नेतृत्त्व आहे. गेल्या ५ वर्षांत त्यांनी आपली परिपक्वता सिद्ध करून दाखवली आहे. ब्राह्मण महासंघ कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही. पण राष्ट्रहिताला प्राधान्य देते, म्हणूनच फडणवीस हे नरेंद्र मोदींनंतर भाजपच्या वैभवशाली नेतृत्त्वाची परंपरा कायम ठेवतील, असा विश्वास आहे.”

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -