घरताज्या घडामोडीडिसले गुरुजींनी शाळेतील शिक्षकपदाचा दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

डिसले गुरुजींनी शाळेतील शिक्षकपदाचा दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

Subscribe

डिसले गुरुजींनी आपला राजीनामा माढा तालुक्यातील प्रशासनाकडे पाठिवला असून प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनाही पाठवला आहे.

जागतिक स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल करणाऱ्या रणजीतसिंह डिसले (Ranjitsingh Disale) यांनी जिल्हा परिषद शिक्षक पदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. त्यांना ग्लोबल टीचर अवॉर्डने (Global Teacher Award) गौरवण्यात आलं होतं. डिसले गुरुजींनी आपला राजीनामा माढा तालुक्यातील प्रशासनाकडे पाठिवला असून प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनाही पाठवला आहे. त्यांनी ७ जुलै रोजीच राजीनामा दिल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली. तसेच, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी राजीनामा अद्याप स्वीकारला नसल्याची माहिती आहे. (Global Teacher Award winning teacher Ranjitsingh Disle resigns, reason unknow)

हेही वाचा – शिक्षण अधिकार्‍यांची रणजित डिसलेंना धमकी

- Advertisement -

रणजीतसिंह डिसले हे ८ ऑगस्ट रोजी अमेरिकेत रवाना होणार आहेत. अमेरिकेतील फुलब्राईट संस्थेची त्यांना शिष्यवृत्ती मिळाल्याने ते तिथे जाणार आहेत. मात्र, अमेरिकेत जाण्याआधीच त्यांनी राजीनामा दिल्याने सर्वांना धक्का बसला आहे.

हेही वाचा – रणजितसिंह डिसले यांना अमेरिकेत जाण्याकरिता रजा मंजूर करा; वर्षा गायकवाडांचे आदेश

- Advertisement -

डिसले गुरुजींना ग्लोबल टीचर अवॉर्ड

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील परितेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत डिसले प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत होते. युनेस्को आणि लंडनमधल्या वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी ग्लोबल टीचर पुरस्कार देण्यात येतो. २०१९ मध्ये डिसले गुरुजींना ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला. या पुरस्काराची रक्कम 1 मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे 7 कोटी रुपयांहून अधिक आहे. डिसले यांनी यातली निम्मी रक्कम इतर 10 शिक्षाकांमध्ये वाटप करण्याचं ठरवलं आहे. तसेच, ग्लोबल टीचर पुरस्कारानंतर जागतिक बँकेच्या सल्लागारपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

हेही वाचा – रणजितसिंह डिसले गुरुजींच्या कार्यकर्तृत्वावर आक्षेप, शिक्षण अधिकारी लोहार यांचे गंभीर आरोप

अमेरिकत जाण्याचा मार्ग खडतर

डिसले गुरुजींना जागतिक पुरस्कार मिळाल्यानंतर जगभर त्यांचं कौतुक झालं मात्र, ते शिकवत असलेल्या शाळेतूनच त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. शिक्षणाधिकाऱ्यांनीही भरपूर त्रास दिल्याचा दावा डिसले गुरुजींनी केला होता. दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून डिसले गुरुजी शाळेत फिरकलेच नसल्याचा आरोप शिक्षण जिल्हाधिकाऱ्यांनी केला होता. तसेच, तीन वर्षांत डिसले गुरुजींनी काय केलं याबाबत चौकशी समितीही बसवण्यात आली. दरम्यान, फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी डिसले गुरुजींनी रजेचा अर्ज केला होता. हा रजेचा अर्जही सुरुवातीला मान्य करण्यात आला नव्हता. सादर केलेल्या अर्जात अनेक त्रुटी असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र, कालांतराने त्यांचा अर्ज स्विकारण्यात आला. त्यामुळे नेमक्या कोणत्या करणाने डिसले गुरुजींनी शाळेचा राजीनामा दिला हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -