घरताज्या घडामोडी'ग्लोबल टीचर' पुरस्कार मिळालेले सोलापूरचे डिसले पहिले भारतीय

‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळालेले सोलापूरचे डिसले पहिले भारतीय

Subscribe

'ग्लोबल टीचर' पुरस्कार सोलापूरच्या जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना घोषित करण्यात आला आहे.

शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल टीचर’चा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार सोलापूरच्या जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना घोषित करण्यात आला आहे. डिसले यांनी विविध देशांतील ५० हजार मुलांची ‘पीस आर्मी’ तयार करून, परस्परांमध्ये सौहार्द निर्मिती केल्याबाबत त्यांना हे नामांकन मिळाले आहे. ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळालेले डिसले हे पहिले भारतीय आहेत.

७ कोटींचा ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार

शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कारासाठी ५० जागतिक शिक्षकांची नामांकन जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये सोलापूरच्या जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्यासोबत दोन भारतीय शिक्षकांचा समावेश आहे. लंडन येथील वाकी फाउंडेशनच्या वतीने मे महिन्यात लंडन येथे होणाऱ्या ‘ग्लोबल एज्युकेशन अँड स्किल फोरम’ या कार्यक्रमात अंतिम निवड झालेल्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांना ७ कोटींचा ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार देण्यात येणार आहे. देशातून सोलापूरचे रणजितसिंह डिसले, दिल्लीच्या विनिता गर्ग आणि राजस्थानचे शुवजीत पायने यांचे अंतिम यादीत त्यांना नामांकन मिळाली असून डिसले हे विजेते झाले आहेत. डिसले हे जिल्हा परिषदेचे एकमेव शिक्षक ठरले आहेत.

- Advertisement -

५० हजार मुलांची ‘पीस आर्मी’

‘लेट्स क्रॉस द बॉर्डर’ या अभिनव शैक्षणिक प्रयोगाच्या माध्यमातून भारत, पाकिस्तान, इराक, इराण, इस्त्रायल, पॅलेस्टाइन, अमेरिका आणि उत्तर कोरियातील ५० हजार मुलांची ‘पीस आर्मी’ त्यांनी तयार केली. त्यातून त्यांनी परस्पर सौहार्द टिकविण्याचा प्रयत्न केला आहे. या शैक्षणिक प्रयोगासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. ‘तंत्रस्नेही शिक्षणाच्या माध्यमातून शांतता निर्माण करण्याचा हा प्रयत्न इतर देशांतील शिक्षकांना प्रेरणादायी आहे,’ अशा शब्दांत निवड समितीने त्यांचा गौरव केला आहे.


हेही वाचा – मच्छीमारांना लवकरच मिळणार डिझेलवरील परतावा – अस्लम शेख

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -