Assembly Election 2022 : गोव्यात महाविकास आघाडीसारखा प्रयत्न तर २ राज्यात शिवसेना निवडणूक लढणार, संजय राऊतांचे वक्तव्य

गोव्यात महाविकास आघाडीसारखा एकादा प्रयोग व्हावा असे आमचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढण्याचा विचारात आहे. काँग्रेसनंही आमच्यासोबत राहावं यासाठी गोव्यात जाऊन प्रयत्न केले आहेत. परंतु जागा वाटप करण्यामध्ये अडचणी आहेत.

sanjay raut said wine is not liquor If wine sale increases farmers will get benefit
'वाईन म्हणजे दारु नव्हे' विक्री वाढली तर शेतकऱ्यांना फायदा होईल, संजय राऊतांचे वक्तव्य

देशातील ५ राज्यांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. या निवडणुकांच्या प्रचारसभा, रॅली आणि पदयात्रांवर बंदी आणली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणूका लढवण्याबाबत तयारी सुरु करण्यात आली आहे. गोव्यात महाविकास आघाडीसारखा प्रयत्न सुरु असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. तर गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना निवडणूक लढवणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. देशातील कोरोना संपला असल्याचे निवडणूक आयोगाला वाटत असल्यामुळे निवडणुका घोषित केल्या असल्याचा खोचक निशाणाही संजय राऊतांनी लगावला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना गोव्यात महाविकास आघाडीसारखा प्रयत्न सुरु असल्याची माहिती दिली आहे. राऊत म्हणाले की, देशात कोरोना नष्ट झाला, जाहीर सभामधून वाढणार नाही असा टोला राऊतांनी लगावला आहे. जाहीर सभा, प्रचारावर, मिरवणूकांवर त्यांनी काही बंधने घातली आहेत ती सगळ्यांसाठी असायला पाहिजेत. आम्ही पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये ते पाहिले आहे. दुसऱ्या लाटेचा कहर सुरु असताना सगळ्या राजकीय पक्षांनी लाटेवर अरुढ होऊन कसे प्रचार केले. विशेषता पंतप्रधान, प्रमुख नेत्यांनी मोठ्या सभा घेऊ नये याचे त्यांनी पालन केले पाहिजे आणि पंतप्रधानांनी आदर्श घालून दिला पाहिजे असे राऊत म्हणाले आहेत.

शिवसेना गोव्यात निवडणूक लढवणार

संजय राऊत म्हणाले की, शिवसेना गोव्यात आणि युपीत निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे. त्यानुसार प्रतयत्न सुरु आहे. इतर प्रमुख पक्ष मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहेत. त्यांचे पोस्टर दिसत आहेत तसे शिवसेनेचे काही दिसत नाही. पण शिवसेनेची भूमिका सगळ्यांपर्यंत जात आहे. कार्यकर्ते आहेत ते निवडणूका लढत असतात त्यांच्यामागे उभे राहणे आमचे काम असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

गोव्यात महाविकास आघाडीसारखा प्रयत्न

गोव्यात महाविकास आघाडीसारखा एकादा प्रयोग व्हावा असे आमचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढण्याचा विचारात आहे. काँग्रेसनंही आमच्यासोबत राहावं यासाठी गोव्यात जाऊन प्रयत्न केले आहेत. परंतु जागा वाटप करण्यामध्ये अडचणी आहेत. काँग्रेसला असं वाटत आहे की, गोव्यात सत्तेवर येतील तर त्यांना शुभेच्छा देतो. भाजपला थांबवण्याची ताकद कोणाकडे असेल तर त्यांनी सत्तेत यावे. जर त्यांना वाटत असेल मोठ्या राज्यातही सत्तेवर येतील तर त्यांनी जावं आम्ही वेगळ्या मार्गाने जाऊ अस विधान राऊतांनी केलं.

प्रमोद सावंतांवर राऊतांचा पलटवार

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शिवसेनेचा गोव्यात एकही सरपंच नाही असे विधान केलं होते. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. कधीकाळी भाजपचाही सरपंच नव्हता आणि साधा पंचही नव्हता. त्यांना माहिती असेल श्रीपाद नाईक जेव्हा काम करत होते तेव्हा काहीच नव्हते. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष फोडून त्यांनी पंच बनवला आहे. सरपंच असल्याचा नसल्याचा काही फरक पडत नाही. आम्ही पहिले विधानसभेतील जागा जिंकू मग सरपंच आपल्या आप येतील. मतांची विभागणी व्हावी यासाठी भाजपने काही विरोधी पक्षातील लोकांना हाताशी धरलंय का? अशी शंका यायला लागली आहे. विरोधी पक्षांना जाणीपूर्वक लढणं गरजेचे आहे. त्यांनी एकत्रपणे निवडणूक लढायला पाहिजे. गोव्यातील लोकांच्या मनात संताप आहे. विरोधकांमध्ये एक्य नसल्यामुळे भाजपला फायदा होत आहे असे संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा : Assembly Election 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर