उत्पल पर्रिकरांचा भाजपाने केलेला अपमान गोव्याची जनता विसरणार नाही – संजय राऊत

Goa Assembly Election 2022 sanjay raut says goa elections steering of maha aaghadi govt hand of uddhav thackeray

उत्पल पर्रिकर यांनी पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर आता भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे गोव्यात विधानसभा निवडणुकांपूर्वी राजकीय वातवारण चांगलेच तापले आहे. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्पल पर्रिकरांचा भाजपाने केलेला अपमान गोव्याची जनता विसरणार नाही असं म्हणत भाजपावर निशाणा साधला आहे.

उत्पल पर्रिकर यांच्या वेदना मी समजू शकतो. ज्या पक्षात त्यांचा जन्म झाला तो पक्ष सोडताना किंवा त्या पक्षापासून दूर जाताना अशाप्रकारच्या वेदना होतात हे काल त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. आमच्या सगळ्यांच्या त्यांना शुभेच्छा आहेत. असं संजय राऊत म्हणाले.

‘ही लढाई बेईमानीविरुद्ध चारित्र्य अशी होणार’

“मनोहर पर्रिकर गोव्यातील असे नेता होते त्यांनी गोव्याचे नाव देशभरात उज्ज्वल केले. एका राजकीय नेत्यांचे चरित्र्य कसे असावे हे पर्रिकरांनी देशाला दाखवून दिले होते. मात्र त्यांच्या मुलाला ज्याप्रकारे अपमानीत करण्यात आले हे गोव्याची जनता विसरु शकणार नाही. आता ही लढाई बेईमानीविरुद्ध चारित्र्य अशी होणार आहे.” असं राऊत म्हणाले.

‘शिवसेनेकडे भाजपाच्या 34 उमेदवारांच्या चारित्र्याचे सर्टिफिकेट’ 

“गोव्याचे पर्रिकर यांनी ज्या जागेचं नेतृत्त्व केले ज्या जागेवर त्यांच्या मुलाच्याविरोधात आता भाजपाने असा उमेदवार उभा केला आहे ज्याच्यावर भष्ट्राचार, माफियागिरी, रेप असे सर्व आरोप आहेत. तो गोव्यात भाजपाचा चेहरा म्हणून उभा राहणार आहे. तसेच पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह त्यांच्या प्रचारासाठी येणार आहेत. देवेंद्र फडणवीस तर येऊनचं बसले आहेत. भाजपाने जाहीर केलेल्या 34 उमेदवारांच्या चारित्र्याचे सर्टिफिकेट शिवसेनेकडे आहे. आणि ते गोव्यातील जनतेला दाखवणार आहे. असंही राऊत म्हणाले आहेत.

लक्ष्मीकांत पार्सेकरसारख्या कार्यकर्त्यांनी गोव्यामध्ये भाजपाची बिजे रोवली हे सगळे चारित्र्यवान कार्यकर्ते होते. आज तेही म्हणत आहेत की, भारतीय जनता पार्टी ला मी पैसे देऊ शकलो नाही म्हणून माझी उमेदवारी नाकारली तर हे दुर्दैवी आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या सोबत माझी बातचीत झाली होती परंतु गोव्याचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांना हे समजत नाही परंतु ते आमचं ऐकत नाहीत एवढा कॉन्फिडन्स त्यांना कोठून येत आहे. असंही राऊत म्हणाले.

‘मी त्यांनी नेहमीच चहा पाजतो’, आशिष शेलारांना दिले प्रत्युत्तर 

शिवसेनेचं गोव्यात डिपॉझिट जरी वाचलं तरी मी संजय राऊत सांगतील तिथे चहा आणि जेवण देईल असं आव्हान भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिले होते. यावर आत संजय राऊत यांनी ‘मी त्यांनी नेहमीच चहा पाजतो’ असं प्रत्युत्तर दिले आहे.

“निवडणूकीचे डिपॉझिट गेल्याने निवडणूक लढायच्याच नाहीत असे कुठे निवडणूक आयोगाने म्हटलेले नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे. पक्षाचा विस्तार करायचा आहे. गोव्यासारख्या राज्यात पक्ष वाढण्यासाठी अशाप्रकारच्या निवडणूका लढवाव्या लागतात. डिपॉझिट गेले तरी आम्ही लढत राहू ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ हा मराठा साम्राज्याचा एक मंत्र आहे. आम्ही लढणारे लोकं आहोत. आम्ही भाजपासारखे भष्ट्र, माफिया, व्याभिचारी, धनदांडगे यांना जर उमेदवारी दिली असती तर आम्ही जिंकून आलो असतो. असेही संजय राऊत म्हणाले.