घरताज्या घडामोडी...आता खरी लढाई मुंबईत होणार, देवेंद्र फडणवीसांचा थेट शिवसेनेला इशारा

…आता खरी लढाई मुंबईत होणार, देवेंद्र फडणवीसांचा थेट शिवसेनेला इशारा

Subscribe

उत्तर प्रदेशात जे कार्यकर्ते आणि नेते गेले होते त्यांचे आभारी आहे. उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही महाराष्ट्राची शान वाढवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे भाजपसाठी काम करायला गेले आणि सपाचा सुफडा साफ करुन भाजप पुन्हा जिंकली आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सत्तेत आणून चमकदार कामगिरी केली. या कामगिरीसाठी फडणवीसांचे मुंबईतील भाजप कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आले आहे. गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवून मतदारांनी मत दिलं आहे. गोव्यात भाजपची एकहाती सत्ता आली परंतु हा विजय साजरा केल्यानंतर आता मुंबईसाठी सज्ज व्हायचे आहे. लढाई संपली नाही तर आता खरी लढाई मुंबईत होणार आहे. असा इशारा फडणवीसांनी शिवसेनेला दिला आहे. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढून महापालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढायचे असल्याचे फडणवीस म्हणाले.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे गोव्यातील विजयामुळे मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात स्वागत करण्यात आले. यावेळी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. कुठल्याच लढाईने होरपळून जायचे नाही. कुठलाही विजय डोक्यात घालायचा नाही. विजयाने नम्र व्हायचे विजयाने अधिक मेहनत करायची. खरी लढाई आता मुंबईत व्हायची आहे. मुंबईला कुठल्या पार्टीपासून मुक्त करायचे नाही तर मुंबईला भ्रष्टाचारातून मुक्त करायचे आहे. आम्ही कुठल्या पार्टीच्या विरोधात नाही तर आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. त्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहे. जोपर्यंत मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढत नाही. तोपर्यंत दम घेता येणार नाही. म्हणून हा विजय आज साजरा करा आणि उद्यापासून कामाला लागा आणि पुन्हा एकदा मुंबईचा प्रचंड विजय या महाराष्ट्रामध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार तयार करण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज राहावे ही आपल्या सर्वांना विनंती करतो.

- Advertisement -

गोव्यात विजय मिळवण्यासाठी सेनेचा मोठा हात

गोव्यात लोकांनी ५ वर्षात डबल इंजिनचे सरकार लोकांनी पाहिले आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल काँग्रेसच्या लोकांनी १ दिवसांपूर्वीच पत्र दिले, म्हणाले ३ वाजता आम्हाला बोलवा आम्ही सरकार स्थापन करायला येऊ परंतु दुसऱ्या दिवशी कोणी गेले नाही. अशी अवस्था काँग्रेसची झाली आहे. मी विशेषता आभार महाराष्ट्रातील आमदारांचे मानतो. आपण इथून जी सेना पाठवली होती, हा विजय मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपच्या सेनेचा फार मोठा हात आहे.

शिवसेनेची लढाई नोटाशी

सेना म्हणजे भाजपची सेना दुसऱ्या सेनेचे काय झाले आपल्याला माहिती असेल. जे त्या ठिकाणी गर्जना करत होते असा टोला फडणवीसांनी शिवसेनेला लगावला आहे. आम्ही भाजपला हरवणार खरं म्हणजे सुरुवातीला सांगितले होते की, त्यांची लढाई आमच्याशी नाही तर त्यांची लढाई नोटाशी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल राष्ट्रवादी आणि काँग्रेसची एकत्र मत केली तरी नोटापेक्षा कमी आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रमोद सावंतांच्या मतदारसंघात जाऊन गर्जना केली होती. सावंत यांना हरवणार, शिवसेनेची सर्व नेते तिथे गेले परंतु उमेदवाराला ९७ मतं मिळाली आहेत. काळ भाजपचा, मोदींचा आणि कार्यकर्त्यांचा, सर्वसामान्यांचा आहे. मी फक्त प्रतिनिधी म्हणून गेलो होते विजय मोदी मिळवून देणार होते परंतु आपला त्यात खारीचा वाटा आहे असे मी समजतो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

किती मळमळ केली तरी मोदीच जिंकणार

सगळ्यांनाच आनंद झाला असे नाही आहे. काही लोकांना इतकी मळमळ आहे की, ते म्हणतात अपरिचित देवदूतापेक्षा परिचित दैत्य बरा, खरं म्हणजे इतकी मळमळ बरी नाही. किती मळमळ केली तरी मोदीच जिंकूण येणार हे लक्षात ठेवलं पाहिजे. जरी कोणाला मळमळ झाली कळकळ झाली तरी लक्षात ठेवा या देशातील गरीब मध्यमवर्ग आणि महिलांचा आशीर्वाद मोदींच्या मागे आहे त्यामुळे आम्ही जिंकणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

शिवरायांच्या मावळ्यांनी यूपीत महाराष्ट्राची शान वाढवली

उत्तर प्रदेशात जे कार्यकर्ते आणि नेते गेले होते त्यांचे आभारी आहे. उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही महाराष्ट्राची शान वाढवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे भाजपसाठी काम करायला गेले आणि सपाचा सुफडा साफ करुन भाजप पुन्हा जिंकली आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : PM Modi Gujrat Tour : यूपीनंतर भाजपचं गुजरातकडे लक्ष्य!, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दोन दिवसीय गुजरात दौरा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -