काय सांगताय! बँकेत पैसे नाही तर मिळतायत ‘बकऱ्या’

महाराष्ट्रात आहे चक्क बकऱ्यांची बँक.

goat bank
काय सांगताय! बँकेत पैसे नाही तर मिळतायत 'बकऱ्या'

आतापर्यंत आपण ब्लड बँक, वॉटर बँक, खातेदारांची बँक अशा एक ना अनेक बँक पाहिल्या आहेत. पण, तुम्ही बकऱ्यांची बँक कधी पाहिली आहे का? वाचल्यावर तुम्हालाही नवल वाटल ना. पण, हे सत्य आहे. महाराष्ट्रात चक्क बकऱ्यांची बँक आहे. महाराष्ट्राच्या अकोल्या जिल्ह्यात ही बँक असून ‘गोट बँक ऑफ कारखेडा’, असे या बँकेचे नाव आहे. ही बँक अकोल्या जिल्ह्यातील सांघवी मोहाली गावातून ऑपरेट केली जाते. या आगळ्या वेगळ्या बँकेने आतापर्यंत अनेकांना उभारी देखील दिली आहे.

असे चालते या बँकेचे कामकाज

एका ५२ वर्षीय नरेश देशमुख या व्यक्तीने २०१८ साली ही बँक उघडली. या बँकेत आतापर्यंत १२००हून अधिक खातेदारांची नोंद आहे. या बँकेत १ हजार २०० रुपयांची एग्रीमेंट केली जाते आणि एक प्रेग्नेंट बकरी खातेदाराला देण्यात येते. त्या एग्रीमेंटमध्ये असे म्हटले आहे की, ‘१२०० रुपयात तुम्हाला एक प्रेग्नेंट बकरी दिली जाणार. त्यानंतर तब्बल ४० महिन्यांनी तुम्ही बँकेला ४ बकऱ्यांची पिल्ले आणून द्यायची’.

अशी मिळाली प्रेरणा

नरेश देशमुख म्हणतात की, ‘बकऱ्यांची बँक काढण्याची प्रेरणा मला एका प्रामाणिक आणि मेहनती मजूर शेतकऱ्याकडून मिळाली. त्या शेतकऱ्याला बकऱ्यांकडून चांगले उत्पादन मिळत होते. तसेच त्या कमाईवर तो छोटी मोठी जमीन खरेदी करुन मुलांचे शिक्षण आणि लग्न करायचा. ते काय करायचे? कसे करायचे? याबाबत मी नेहमी लक्ष ठेऊन असायचो. त्यानंतर मी ही विचार केला आणि गोट बँक उघडली.

आणि असा सुरु झाला व्यवसाय

नरेश देशमुख यांनी ४ जुलै २०१८ रोजी व्यवसायला सुरुवात केली. सर्वात आधी त्यांनी ४० लाखांच्या ३४० बकऱ्या खरेदी केल्या. त्यानंतर गरजू आणि प्रामाणिक शेतकऱ्यांना ११०० रुपये रजिस्ट्रेशन फी घेऊन एक-एक बकरी देऊन टाकली. नंतर ४० महिन्यानंतर बकरीची चार पिल्ले आणून देण्यास सांगितले आणि व्यवसायाला सुरुवात झाली. असं पाहिला गेले तर बकरी ४० महिन्यात ३० पिल्लांना जन्म देते. त्यामुळे त्यातील चार पिल्ले बँकेला आणून दिली तरी त्यांच्याकडे २६ पिल्ले राहतात. त्यानुसार महिन्याला नाही म्हटले तरी लाखो रुपयांचे उत्पन्न होते.

८०० बकरे परत आले

मजूरांना देण्यात आलेल्या बकरींपैकी ८०० पिल्ले शेतकऱ्यांनी आणून दिली. त्यानंतर बकऱ्यांनी पिल्ले एका कॉन्ट्रेक्टरला विकल्यानंतर तब्बल १ कोटीचा फायदा झाला.

वजनावर विकला जातो बकरा

बकऱ्याची किंमत ही त्याच्या वजनावर ठरते. एखाद्या बकऱ्याचे वजन ३५ ते ५२ किलो असेल तर त्यानुसार १२ ते १८ हजाराला बकरा विकला जातो.

बकऱ्याचे जीवनमान

बकरा किंवा बकरीचे जीवन हे ८ ते १२ वर्षांचे असते. त्यानुसार ते ७ वर्षांपर्यंत पिल्लाला जन्म देऊ शकतात. बकरी ज्यावेळी पहिल्यांदा पिल्लाला जन्म देते त्यावेळी तिचे वय ७ ते १० महिने असणे गरजेचे असते. तर बकऱ्याचे वय ४ ते ८ महिने असणे गरजेचे असते. तर बकरीच्या गर्भधारणेचा कालावधी १४६ ते १५५ दिवसांचा असतो.


हेही वाचा – Corona Vaccination: आठवडाभरात फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण सुरू होणार