घरमहाराष्ट्रदुष्काळी मराठवाड्याला दिलासा; गोदेचे पाणी जायकवाडीत दाखल

दुष्काळी मराठवाड्याला दिलासा; गोदेचे पाणी जायकवाडीत दाखल

Subscribe

नाशिक जिल्ह्यातल्या धरणसमूहाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने गोदावरी नदी यंदा पावसाळ्यात पहिल्यांदाच दुथडी भरून वाहत आहे. आज सकाळी गोदावरीचे पाणी औरंगाबाद जिल्ह्यातील जुने कायगावला धडकले.

पाणी जुने कायगावला पोहोचले की जायकवाडी धरणात पाण्याच्या आवकाची नोंद सुरु होते. नाशिक जिल्ह्यातील धरणसमूहाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने गोदावरीला पाणी येण्याची या भागातील नागरिक वाट पाहत होते.

- Advertisement -

औरंगाबाद जिल्ह्यात असणाऱ्या गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापपर्यंत एकही समाधानकारक पाऊस न झाल्याने नदीचे ठिकठिकाणी कोरडे पडले होते. अनेक ठिकाणी नदीपात्रात पाण्याचा खंड पडला होता. मात्र आज सकाळीच गोदावरी भरून वाहिल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -