घरताज्या घडामोडीगोकुळ दूधसंघ निवडणुकीच्या तोंडावर ठरावधारक सुभाष पाटील यांचा कोरोनामुळे मृत्यू

गोकुळ दूधसंघ निवडणुकीच्या तोंडावर ठरावधारक सुभाष पाटील यांचा कोरोनामुळे मृत्यू

Subscribe

गोकुळ दूध संघाची निवडणुकीचे मतदान येत्या २ मे रोजी पार पडणार आहे. पण त्यापूर्वीच एका ठरावधारकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात ठरावधारक सुभाष सदाशिव पाटील यांनी ५४व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पण सदाशिव पाटलांच्या निधनामुळे ठरावधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी ८ ते १० ठरावधारकांना कोरोनाची लागण झाली होती.

५४ वर्षीय सुभाष सदाशिव पाटील हे शाहूवाडी तालुक्यातील डोणोली येथील कै. सदाशिव पाटील दूध संस्थेचे ठरावधारक होते. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सुभाष सदाशिव पाटील यांचा मृत्यू हळहळ व्यक्त करणारा आहे.

- Advertisement -

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोकूळची निवडणूक पुढे ढकलावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात आहेत. सत्ताधाऱ्यांनी देखील निवडणूक पुढे ढकलण्यासाठी विनंती केली होती. मात्र आता नेमकी अशा पद्धतीने ही निवडणूक पार पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर पुढे आणखी ठरावधारक कोरोना पॉझिटिव्ह आढळले तर कोल्हापुर जिल्ह्यात गंभीर वातावरण तयार होणार आहे.

कोल्हापुरात आतापर्यंत ५५ हजार २६५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यापैकी १ हजार ७१७ जणांचा मृत्यू झाला असून ५० हजार ५२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ३ हजार २१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण लॉकडाऊन लावला पाहिजे – महापौर किशोरी पेडणेकर


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -