Gold-Silver Prices : सोने चांदीच्या दरात घसरण, वाचा आजचे दर?

लग्नसराई सुरू झाल्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतींना मागणी

gold

नाशिकच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याची माहिती समोर आली आहे. आज वर्षातल्या शेवटच्या आणि गुरूपुष्यामृत योगादिवशी सोन्याची किंमत कमी झाली आहे. सोन्याच्या दरात आज(गुरूवार) दीड हजार रूपयांची तर चांदीच्या दरात ४ हजार रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेटच्या सोन्याचा दर ४७ हजार ९०० रूपये इतका आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ४६ हजार ३०० रूपये इतका नोंदवण्यात आला आहे. मात्र, येणाऱ्या काळात सोने महाग होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि दुसरीकडे दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या किंमती उतरल्या आहेत. परंतु आता तुळशी विवाहनंतर लग्नसराईला सुरूवात झाली आहे. त्यामु्ळे सराफा बाजारात ग्राहकांची वर्दळ पहायला मिळत आहे. नाशिकच्या सराफा बाजारपेठात २२ नोव्हेंबर म्हणजेच तीन दिवसांपूर्वी २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅम मागे ४९ हजार ४०० रूपये नोंदवले गेले. २२ कॅरेट सोन्याचे दर ४७ हजार ९५० नोंदवले गेले होते. तर चांदीचे दर किलोमागे ६७ हजार ८०० रूपये होते.

२४ नोव्हेंबर रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅम मागे ४७ हजार ८५० रूपये नोंदवले गेले आहे. तर आज गुरूवारी २५ नोव्हेंबर रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅम मागे ४७ हजार ९०० रूपये तर २२ कॅरेट सोन्याचे दर ४६ हजार ३०० रूपये नोंदवले गेले होते. तसेच सोन्याच्या दरात दीज हजार रूपयांची आणि चांदीच्या दरात ४ हजार रूपयांची घसरण झाली.


हेही वाचा: परमबीर सिंह यांची गुन्हे शाखेकडून ७ तास चौकशी, सर्व आरोप खोटे असल्याचा दावा


दरम्यान, सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत. परंतु मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर डिसेंबर महिन्याच्या डिलिव्हरीसाठी सोन्याच्या भावात ०.२४ टक्क्यांनी घसरण झालीये. तर चांदीच्या भावात ०.३२ टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसत आहे. परंतु लग्नसराई सुरू झाल्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतींना मागणी वाढली आहे. तर सोने आता पुन्हा ५० हजारांच्या घरात १० ग्रॅमच्या दिशेने जाणार असल्याचं दिसत आहे.