घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये भरदिवसा सोनसाखळी चोरी

नाशिकमध्ये भरदिवसा सोनसाखळी चोरी

Subscribe

चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद

नाशिक महानगरात घरफोडी, वाहनचोरीसह सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी (दि.२६) भरदिवसा पंजाब कॉलनी, व्यापारी बँकेसमोर जेल रोड येथून घराच्या दिशेने जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून नाशिकरोड पोलिसांनी सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी तपास सुरू केला आहे.

- Advertisement -

जेल रोड परिसरातील महिला घराच्या दिशेने जात होती. त्या पंजाब कॉलनी येथील व्यापारी बँकेसमोर आले असत्या दुचाकीवरून दोनजण त्यांच्या जवळ आले. काही कळण्याच्या आत दुचाकीवरील एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली. त्यांनी आरडाओरड केली असता चोरटे दुचाकीवरून पळून गेले. याप्रकरणी महिलेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास नाशिकरोड पोलीस करत आहेत.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -