घरताज्या घडामोडीहौसेला मोल नाही! वधूसाठी खास सोन्याचा मास्क, नेकलेसची वाढली मागणी

हौसेला मोल नाही! वधूसाठी खास सोन्याचा मास्क, नेकलेसची वाढली मागणी

Subscribe

कोरोना काळात मास्क घालणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे सध्या बाजारात वेगवेगळ्या स्टाईलचे मास्क उपलब्ध झाले आहेत. लग्नाचा सीजन असल्यामुळे बाजारात वधू-वरासाठी काही वेगळ्या मास्कची मागणी वाढली आहे. ही मागणी विक्रेता पूर्ण देखील करत आहे. दरम्यान पुण्याच्या रांका ज्वेलर्सने लग्नात वधूसाठी खास सोन्याचा मास्क तयार केला आहे. या १२४ ग्रॅम सोन्याच्या मास्कची किंमत ६.५ लाख रुपये आहे.

हा खास सोन्याचा मास्क या काळात नेकलेस सारखा देखील घालू शकता. हा एन-९५ मास्कवर स्टिच केला आहे. या मास्क २५ दिवसांनंतर धुवून पुन्हा घालू शकता. विशेष म्हणजे याचा वापर झाल्यानंतर सहजपणे बदलता येऊ शकते. आतला मास्क खराब झाल्यानंतर हा सोन्याचा मास्क दुसऱ्या मास्कवर बसवता येईल अशा पद्धतीने तयार केला आहे. हा मास्क डिझाईन आणि तयार करण्यासाठी दोन ते तीन आठवडे लागले. या मास्कसाठी लागणारे डाई खास करून तुर्की येथून मागवले आहेत.

- Advertisement -

रांका ज्वेलर्सच्या म्हणण्यानुसार, लग्नासारख्या शुभकार्याच्या ठिकाणी प्रत्येकाला मास्क घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही वधू-वरासाठी एक खास मास्क तयार केला आहे. हा मास्क सगळ्यांना खूप आवडत आहे. याची मागणी सतत वाढत आहे. कोरोना काळाच्या नंतर हा मास्क नेकलेस सारखा देखील घालू शकता, असे या ज्वेलर्सचे म्हणणे आहे. महिलांना सध्या हा मास्क खूपच आवडत आहे. याशिवाय पुरुषांसाठी देखील सोन्याचा मास्क तयार केला जात आहे.

यापूर्वी सुरतमधील एका ज्वेलर्सने हिऱ्यांपासून तयार केलेला मास्क विकण्यास सुरुवात केली होती. या मास्कची किंमत दीड लाखांपासून ते चार लाखांपर्यंत होती. दरम्यान पुण्यातील एका शंकर कुराडे नावाच्या व्यक्तीने २.८९ लाख रुपयांचा सोन्याचा मास्क तयार करून घेतला होता.

- Advertisement -

हेही वाचा – Corona: पुण्यात कोरोनाचा कहर कायम, एका रात्रीत २७५ रुग्णांची वाढ!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -