घरमहाराष्ट्रGold Man: पंढरीनाथ फडकेंचं निधन; पनवेलमध्ये घेतला अखेरचा श्वास

Gold Man: पंढरीनाथ फडकेंचं निधन; पनवेलमध्ये घेतला अखेरचा श्वास

Subscribe

महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरीशेठ फडके यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

पनवेल: महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरीशेठ फडके यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. बैलगाडा प्रेमी गोल्डमॅन म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. जिथे बैलगाडा शर्यत तिथे पंढरी शेठ फडके हे समीकरण अगदी ठरलेले होते. हातात आणि गळ्यात किलोभर सोनं घालून बैलगाडा शर्यतीमध्ये गाडीच्या टपावर चढून ते जो नाच करायचे तो प्रसिद्ध होता. (Gold Man Death of bullock cart lover Pandharinath Phadke He breathed his last in Panvel)

पनवेल तालुक्यातील विहिघर येथील पंढरीनाथ फडके संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध होते. 1996 पासून वडिलांमळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला. शर्यत जिंकल्यानंतर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा तरीही शर्यत जिंकायची क्रेझ वेगळी होती. तिथपासून सुरू झालेली आवड फडकेंनी जपली होती. आतापर्यंत 40 ते 50 शर्यतींचे बैल त्यांनी राखून ठेवले होते.

- Advertisement -

कोणत्याही शर्यतीमध्ये एक नंबरला असलेला बैल पळायला लागला की त्याच्यावर पंढरीशेठ यांची नजर असायची. त्यानंतर त्याची कितीही किंमत असतली तरी ते विकत घ्यायचे. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील टॉपचा समजला जाणार बादल बैलही होता. त्याने तब्बल 11 लाख रुपयांची शर्यत जिंकली होती. आज 21 फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले. पंढरीनाथ फडके हे गोल्डन मॅन म्हणूनही ओळखले जायचे.

अंदाधुंद गोळीबार

अंबरनाथमध्ये 2022 मध्ये बैलगाडा शर्यत सुरू असतानाच वाद होऊन 13 नोव्हेंबर 2022 रोजी पंढरीनाथ फडके आणि कल्याणचे बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर अंदाधुंद गोळीबारही करण्यात आला होता. त्याप्रकरणी त्यांच्यासह एकूण 32 जणांवर हत्येचा प्रयत्न आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

गोळीबार प्रकरणानंतर पंढरीशेठ फडके हे जामिनावर सुटले होते. मात्र आज त्यांच्या निधनामुळे पनवेल, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

(हेही वाचा: Manoj Jarange : बारसकरांच्या आरोपांवर जरांगे म्हणतात, ‘सरकारने माझ्याविरुद्ध सापळा रचला’)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -