घरमहाराष्ट्रनागपूरचंद्रपूर, सिंधुदुर्गपाठोपाठ नागपूरमध्येही सोन्याच्या खाणी, जीएसआयचा अहवाल

चंद्रपूर, सिंधुदुर्गपाठोपाठ नागपूरमध्येही सोन्याच्या खाणी, जीएसआयचा अहवाल

Subscribe

नागपूर- चंद्रपूर आणि सिंधुदुर्गात सोन्याच्या खाणी असल्याचा अहवाल केंद्रीय खनिकर्म विभागाच्या अहवालात म्हटलं होतं. त्यानुसार, राज्य खनिकर्म विभागाने चौकशीही सुरू केली आहे. दरम्यान, आता नागपूर जिल्ह्यातही सोन्याचे मुबलक प्रमाणात साठे असल्याचा अंदाज भूगर्भ सर्वेक्षण विभागाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा महाराष्ट्रात सोन्याच्या खाणी? चंद्रपूर, सिंधुदुर्गात खनिकर्म विभागाकडून शोधकाम सुरू

- Advertisement -

नागपूर जिल्ह्यात परसोडी, किटाळी, मरुपार येथे आणि भंडारा जिल्ह्यातील भीमसेन किल्ला पहार येथे सोन्याचा खजिना असल्याची माहिती जीएसआयच्या सर्वेक्षणातून समोर आली होती. तर, भिवापूर परिसरातही सोन्याचे साठे असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. याबाबत जीएसआयने राज्य सरकारकडे खोदकाम करण्याचा अहवालही दिला होता. मात्र, राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले असल्याचं म्हटलं जातंय.

दरम्यान, नागपूर विभागातही इतर मौल्यवान धातूंचे साठे असल्याचं जीएसआयने आपल्या अहवालात नमूद केलं होतं. परसोडीमध्ये तांब्याचे, कुही, खोबाना परिसरात टंगस्टनचे साठे असल्याचं जीएसआयच्या अहवालात आहे. तर, नागपूर जिल्ह्यात रानबोरी, भावनेरी भागात झिंक धातूचे साठे आहेत.

- Advertisement -

कुठे काय आहे?

  • सोन्याचे साठे – भिवापूरच्या परसोडी किटाळी, मरुपार
  • तांब्याच्या खाणी – परसोडी भाग
  • टंगस्टन – कुही, खोबना
  • झिंक – रानबोरी, भावनेरी
  • निकेल, कोबाल्ट, क्रोमाइट, प्लॅटिनम – भंडारा

राज्यात सोन्याच्या खाणी असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेत केला होता. राज्यात सोन्याचे दोन ब्लॉक असल्याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. आमच्या काळात हे सोने निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल. राज्यात खनिकर्म क्षेत्राला खूप मोठा वावा असून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात देशातील सर्वांत मोठा स्टील प्रकल्प सुरू करू शकतो, असा विश्वास आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -