घरताज्या घडामोडी४ दिवसात सोन्याचा भाव ४ हजारांनी वाढला

४ दिवसात सोन्याचा भाव ४ हजारांनी वाढला

Subscribe

संपुर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर एकाच आठवड्यात सोन्याला पुन्हा एकदा तेजी आली आहे. चार दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये प्रति १० ग्रॅम ४ हजारांनी वाढ झाली आहे. केंद्र सरकार आणि सेंट्रल बॅंक यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर हाती घेतलेल्या अनेक उपाययोजनांमुळे आता सोन्याला पुन्हा एकदा चांगला दर मिळू लागला आहे. पण सोन्याच्या किंमतीत वाढ होत असली तरीही लॉक डाऊच्या स्थितीमुळे सोन्याला मागणी नाही अशीच स्थिती भारतात आहे.

जागतिक पातळीवर आजही रूपया घसरल्याचा परिणाम हा सोन्यावरही पहायला मिळाल आहे. या संपुर्ण आठवड्यात सोन्याच्या भावात सरासरी ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पण ग्राहकांना करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बाजारात सोने खरेदीसाठी बाहेर पडता येत नाही. म्हणून सोन्याच्या मागणीवर याचा परिणाम झाला आहे. आज सोन्याच्या किंमतीत घट झालेली पहायला मिळाली आहे. एमसीएक्स एक्जेंजमध्ये आज सकाळी सोन्याचा भाव ६४१ रूपयांनी कमी झाला. सोन्यासाठी १० ग्रॅमसाठी ४३ हजार ००२ रूपये इतका भाव होता. सोन्यासोबतच चांदीतही आज घसरण पहायला मिळाली आहे. चांदीमध्ये प्रति किलोमध्ये ३६० रूपये किंमतीची घट पहायला मिळाली. चांदीचा प्रति किलोमागील भाव हा ४१ हजार १५० रूपये इतका होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -