घरट्रेंडिंगसोने ५० हजाराचा भाव गाठणार, 'करोना'मुळे तेजी

सोने ५० हजाराचा भाव गाठणार, ‘करोना’मुळे तेजी

Subscribe

जगभरातील घडामोडींचाही परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत आहे.

करोना व्हायरसच्या आरोग्याच्या संकटाने जगभरात भीतीचे वातावरण असले तरीही जागतिक बाजारपेठेत मात्र सोने खरेदीसाठी मात्र ग्राहकांचा चांगला प्रसिसाद मिळत आहे. सर्वात सुरक्षित म्हणून गुंतवणुकीसाठी सोन्याला पसंती मिळत ५० हजार रूपयांचा दर लवकरच मिळण्याची शक्यता आहे असे तज्ञांचे मत आहे. भारतीय स्थानिक बाजारपेठेत वर्ष अखेरीपर्यंत ५० हजार रूपयांचा दर गाठण्याचे संकेत आहेत. आज सोन्याला स्थानिक बाजारपेठेत सोन्याचा दर ४४ हजार ७४४ रूपये इतका गाठला आहे. करोन वायरस तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडी यामुळेच लवकरच ५० हजार रूपयांपर्यंत हा भाव जाईल असे संकेत आहेत.

करोना व्हायरसचे संकट हे आगामी तीन महिन्याच्या कालावधीसाठी चीनच्या अर्थ व्यवस्थेवर परिणाम करू शकते. आतापर्यंत जगभरातील ८६ देशांमध्ये ९५ हजार लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे जगभरातच विविध अत्यावश्यक गोष्टींच्या पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली आहे. तसेच जागतिक पातळीवर अनेक देशांच्या विकासावरही याचा परिणाम झालेला आहे. जगभरात विविध गोष्टींमुळे अर्थव्यवस्थेत दिसून आलेले अस्थिर वातावरण पाहता आता लोक सोन्यामध्ये गुंतवणुक करत आहेत असाही ट्रेंड यानिमित्ताने समोर आला आहे. जगभरात स्पॉट गोल्ड खरेदीच्या किंमती जानेवारीपासून जवळपास ८.१३ टक्क्यांनी वाढलेल्या आहेत. गेल्या वर्षी संपुर्ण वर्षभरात ही वाढ १८ टक्के इतकी झाली होती. यंदा एकाच महिन्यात ही वाढ ६ टक्के झाली आहे. सुरक्षित गुंतवणुक म्हणून सोनेखरेदीकडे पाहिले जात असल्यानेच सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ पहायला मिळत आहे.

- Advertisement -

अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बॅंकेने काही दिवसांपूर्वी व्याज दरात रेट कट जाहीर केल्यानेच सोन्याच्या मार्केटला झळाली आहे. याआधीही २००८ मध्ये अशाच पद्धतीचा रेट कट जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी सोन्याच्या किंमतीत १६ टक्के इतकी वाढ झाली. या बॅंकेकडूनच खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात असल्यानेच गुंतवणुकदारांना या व्हायरसचा जागतिक फटका काय असू शकतो याचा अंदाज आला आहे. म्हणूनच सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ होण्याचे संकेत आहेत. भारतातही रूपयाचे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सातत्याने होणारे अवमूल्यन हे त्याचेच संकेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -