Gold Price Today: सोने-चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी, सोने अजूनही 9512 रुपयांनी स्वस्त

दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 98 रुपयांनी किरकोळ घसरून 46,688 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,786 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते.

नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात आज म्हणजेच 30 डिसेंबर 2021 रोजी सोन्याच्या किमतीत घसरण झाली (Gold Price Today 30 December 2021). खरं तर चांदीच्या किमतीतही (Silver price Today 30 December 2021) घट झालीय. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात केवळ 98 रुपयांची घट नोंदवण्यात आली. त्याचबरोबर आज चांदीचा भाव 699 रुपयांनी घसरला.

जाणून घ्या आज सोन्याचा भाव किती?

दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 98 रुपयांनी किरकोळ घसरून 46,688 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,786 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते.

ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला

सोने सध्या 9512 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. सोन्यानं ऑगस्ट 2020 मध्ये सर्वकालीन उच्चांक गाठला. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

आज चांदीची किंमत किती झाली?

दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी चांदीचा भाव 699 रुपयांनी घसरल्यानंतर 60,024 रुपये प्रति किलोवर बंद झाला. त्याच वेळी चांदीचा भाव 60,723 रुपये प्रति किलोवर बंद झाला.

मिस्ड कॉल देऊन सोन्याचे दर तपासा

सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवा दर पाहू शकता.

अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता

आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलेय. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.