मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात फारशी वाढ झाली नसल्याची पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याचे भाव काही आठवड्यांपूर्वी घटल्याने नागरिकांनी सोने घेण्यासाठी सोनाऱ्याच्या दुकानात गर्दी होती. त्यामुळे ऐन लग्नसराई सुरू असताना अनेक नागरिकांनी याचा फायदा घेतला. परंतु, आता पुन्हा एकदा सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं-चांदीचे दर वाढल्याने भारतातही भाव वधारले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या भावात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर, चांदीच्या दरातही चांगलीच तेजी झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Gold Price Today in mumbai news in Marathi)
रशिया-युक्रेन युद्ध आणि पश्चिम आशियातील संघर्षाच्या स्थितीमुळे वैश्विक तणाव वाढला आहे. यामुळेही सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आज चांदीच्या दरात सलग चौथ्या दिवशीही वाढ झाली आहे. आज चांदीच्या किंमतीत 900 रुपयांनी वाढून 91 हजार 700 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी झाली आहे. मागील आठवड्यात चांदी 3,550 रुपये किलोग्रॅमची तेजी आली होती. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किंमतीत 160 रुपयांची वाढ झाली असून 76 हजार 680 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. शुक्रवारी सोने 76 हजार 544 रुपयांवर व्यवहार बंद झाला होता. चांदी या दरम्यान 186 रुपयांच्या तेजीसह 89.073 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहार करत आहे. मागील सत्रात चांदी 88 हजार 887 रुपयांवर बंद झाली होती.
हेही वाचा… Parag Patil : ऑलिम्पिक पदक विजेता चालवतोय टॅक्सी; कोण आहे हा खेळाडू?
आज सोमवारी (ता. 30 डिसेंबर) 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची वाढ झाली असून सोनं 78 हजार रुपयांवर स्थिरावले आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 150 रुपयांची वाढ झाली असून 71 हजार 500 रुपयांवर स्थिरावले असून 18 कॅरेट सोन्याच्या दरात 120 रुपयांची वाढ होऊन 58 हजार 500 रुपयांवर स्थिरावले आहे. त्यामुळे आज मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 71 हजार 500 रुपये, 24 कॅरेट सोन्याचा भाव 78 हजार रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 58 हजार 500 रुपये आहे. ज्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात आणखी काही वाढ होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे.