दिवाळीच्या मुहूर्तावर १० ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतील एवढे पैसे

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांचा हिरमोड.

Gold prices rise in Diwali Festival
दिवाळीच्या मुहूर्तावर १० ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतील एवढे पैसे

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ होत आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी सोने घेणे शुभ मानल जाते. मात्र ग्राहकांचा पहिल्या दिवशीच हिरमोड झालेला दिसून येत  आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठातही सोन्याच्या दराला तेजी मिळाली आहे. त्यामुळे सोने महागले आहे. असे असले तरी पुढील काही दिवसांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दिल्लीच्या सराफ बाजारात सोन्याचे दर वाढलेले आहेत. धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याची किंमत वाढली आहे. नवीन सोन्याची किंमत २४१ रूपये प्रति तोळा झाली आहे. सोन्याच्या दराने उसंडी मारली आहे. शुक्रवारी सोन्याचा दर सराफ बाजारात १० ग्रॅमला ५० हजार ४२५ रूपयांवर पोहचला आहे. हाच दर गुरूवारी ५० हजार १८४ रूपये प्रति ग्रॅम एवढा होता. आतंरराष्ट्रीय बाजारतही सोन्याचे दर वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठात सोन्याचे भाव १ हजार ८८० डॉलर औन्स आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर सोन चांदी खरेदी करतात. अनलॉकनंतर आता लग्नसारंभही व्हायला सुरूवात झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे लोकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो आहे. त्यातही सोने खरेदी करणे आता न परवडणारे झाले आहे. ऐन मुहूर्तावर सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांनी दागिन्यांच्या दुकानांवरून पाठ फिरवली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावरही सोन्याच्या दरात वाढ झाली होती. आता दिवाळीच्या पहिल्या दिवशीही सोन्याचे दर कमी झालेले नाहीत.


हेही वाचा- निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला २६८ कोटींची मदत जाहीर