Homeमहाराष्ट्रGold Rate Today : सोन्याचा दर 80 हजारावर, जाणून घ्या नेमका भाव...

Gold Rate Today : सोन्याचा दर 80 हजारावर, जाणून घ्या नेमका भाव किती?

Subscribe

सोन्याच्या दरांनी बुधवारी (ता. 29 जानेवारी) नवा उच्चांक गाठला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए)च्या नोदींनुसार 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम वजनाच्या सोन्याचा भाव बुधवारी 506 रुपयांनी वाढून 80 हजार 819 रुपयांवर पोहोचला.

मुंबई : सोन्याच्या दरांनी बुधवारी (ता. 29 जानेवारी) नवा उच्चांक गाठला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए)च्या नोदींनुसार 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम वजनाच्या सोन्याचा भाव बुधवारी 506 रुपयांनी वाढून 80 हजार 819 रुपयांवर पोहोचला. हा सोन्याच्या दरांचा आजवरचा उच्चांक आहे. याआधी मंगळवारी (ता. 28 जानेवारी) सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 80 हजार 313 रुपये इतके होते. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याच्या दरांवर परिणाम झाल्याचे आता म्हटले जात आहे. (Gold Rate Today at 80 thousand cross)

31 डिसेंबर 2024 रोजी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमकरीता 76 हजार 162 रुपये इतके होते. परंतु, मागील 29 दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये 4657 रुपयांची वाढ झाल्याने 29 जानेवारी रोजी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 80 हजार 819 रुपयांवर जाउन स्थिरावले. बुधवारी चांदीचे दरही प्रति किलो 678 रुपयांनी वधारून 90 हजार 428 रुपयांवर जावून पोहोचले आहेत. मंगळवारी चांदीचे दर प्रति किलो 89 हजार 750 इतके होते. चांदीने गेल्या वर्षी ऑक्टोबर 2024 मध्ये प्रति किलो 99 हजार 151 रुपयांचा उच्चांक गाठला होता. 31 डिसेंबर 2024 रोजी चांदीचा दर प्रति किलो 86 हजार 017 रुपये इतकी होता. मागील 29 दिवसांमध्ये चांदीच्या दरांत 4411 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

हेही वाचा… GSLV-F15/NVS-02 launch : इस्रोचे खणखणीत शतक, NVS-02 प्रक्षेपित केल्याने होणार हे फायदे

दरवाढीची कारणे काय?

एकिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढत असतानाच डॉलरच्या तुलनेत रुपयची घसरणही सुरूच आहे. त्याचाच फटका सोने खरेदीला बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून सोन्याची आयात करण्याकरीता भारताला डॉलरच्या रुपात अधिक खर्च करावा लागत आहे. बुधवारी एका डॉलरचे मूल्य 86.55 रुपये इतके होते.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून जगभरात राजकीय पातळीवरील तणाव वाढला आहे. गुंतवणूकदार गोंधळात असल्याने शेअर बाजारातील गुंतवणूक काढून घेत आहेत.

परिणामी शेअर बाजारात पडझड सुरू आहे. गुंतवणूकदार भविष्याच्या दृष्टीने सोन्यातील गुंतवणुकीला अर्थात गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड बाँडला प्राधान्य देत आहेत. अमेरिकन बँकेपाठोपाठ इतर देशही व्याजदरांत कपात करण्याची शक्यता असल्याने अनेक गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणुकीकडे नजरा वळवल्या आहेत. या सर्व परिणामांची देशांतर्गत सराफा बाजाराला झळ बसत आहे.