घरताज्या घडामोडीगोंदे दुमाला ग्रामपंचायत उपसरपंचपदी परशराम नाठे बिनविरोध

गोंदे दुमाला ग्रामपंचायत उपसरपंचपदी परशराम नाठे बिनविरोध

Subscribe

अस्वली स्टेशन : इगतपुरी तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमुळे संपन्न व सधन समजल्या जाणार्‍या गोंदे दुमाला ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विकास पॅनलचे परशराम निवृत्ती नाठे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.

सिताबाई कचरू नाठे यांनी उपसरपंचपदाचा आवर्तन पध्दतीने राजीनामा दिल्याने रीक्त झालेल्या जागेच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात आज विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी सरपंच गणपत जाधव, लोकनियुक्त सरपंच शरद सोनवणे व माजी सरपंच कचरू नाना धोंगडे यांच्या नेतृत्वाखालील विकास पॅनलचे परशराम निवृत्ती नाठे यांची बिनविरोध निवड झाली.

- Advertisement -

सरपंच शरद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत उपसरपंचपदासाठी परशराम निवृत्ती नाठे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणुक अधिकारी म्हणुन उपस्थित असलेले ग्रामसेवक विजयराज जाधव यांनी परशराम नाठे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी ग्रामस्थांनी गुलाल उधळून व फटाक्यांची आतषबाजी करून आनंद उत्सव साजरा केला. यावेळेस निवडीप्रसंगी ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य गणपत जाधव, लोकनियुक्त सरपंच शरद सोनवणे, माजी उपसरपंच सिताबाई कचरू नाठे, माजी सरपंच कचरू नाना धोंगडे, कृष्णा सोनवणे, शोभा नाठे, शिवराम बाबा बेंडकुळे आदी सदस्य यावेळी निवडीच्या बैठकीस उपस्थित होते.

उपसरपंचपदाची निवड झाल्यानंतर उपस्थितांनी गुलाल उधळून व फटाके फोडीत एकच जल्लोष केला. यावेळी विविध कार्यकारी सोसायटी माजी चेअरमन विजय नाठे, विद्यमान चेअरमन शांताराम जाधव, संजय अमृता नाठे, देवराम नाठे, नारायण धोंगडे, माजी सदस्य नारायण गणपत नाठे, निवृत्ती नाठे, तुकाराम नाठे, अनिल सातपुते, सागर नाठे, निलेश नाठे, दत्तू आहेर, शरद नाठे, धिरज सोनवणे, विनोद सोनवणे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -