घरक्राइमगोंदियातील बलात्कार प्रकरणाचा तपास एसआयटीकडे, महिला अधिकाऱ्याची होणार नियुक्ती

गोंदियातील बलात्कार प्रकरणाचा तपास एसआयटीकडे, महिला अधिकाऱ्याची होणार नियुक्ती

Subscribe

मुंबई : गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. आयपीएस दर्जाच्या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे आहे. त्यामुळे संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यापुढे अशी घटना करावयास कुणी धजावणार नाही असे कठोर शासन आरोपींना व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांशी देखील चर्चा केली. पीडित महिलेला सर्वतोपरी उपचार मिळावेत, कुठलीही हयगय यात होणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासानाला दिले आहे.

- Advertisement -

काय आहे घटना?
पतीपासून विभक्त झालेली पीडित महिला गोंदियामध्ये राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे आली होती. 30 जुलैला बहिणीसोबत भांडण झाल्याने तिने रात्री बहिणीचे घर सोडले. गोंदियातील जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कमरगाव या ठिकाणी आईकडे जात असताना, घरी सोडण्याच्या बहाण्याने एकाने तिला कारमध्ये बसवले. मात्र, त्याने तिला घरी न सोडता दोन दिवस तिच्यावर अत्याचार केले. नंतर पळसगावच्या जंगलात सोडून त्याने पळ काढला.

पीडिता कशीबशी जंगलातून निघून भंडाऱ्यातील लाखनी तालुक्याच्या कन्हाळमोह गावातील धर्मा ढाब्यावर पोहोचली. तिथे दुचाकी दुरुस्त करणाऱ्या एकाने घरी सोडण्याच्या बहाण्याने पीडितेवर अत्याचार केले. नंतर त्याने दुसऱ्या दिवशी त्याने मित्रासह तिच्यावर अत्याचार केले. कन्हाळ मोह गावाच्या पुलाजवळ सकाळी 8 वाजता विवस्त्र अवस्थेत सोडून तिथून पळ काढला. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -