राज्याची चांगली कामं होवो, उद्धव ठाकरेंकडून शुभेच्छा

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे २०वे आणि साताऱ्याचे ४ थे मुख्यमंत्री ठरले आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!, असं ट्विट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून ट्विटरवरून शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील आता शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथ शिंदेजी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले अभिनंदन, खरचं मनापासून आनंद झाला, नाशिबाने आपल्याला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. आता ती स्वकर्तृत्वाने सिद्ध कराल ही आशा. अशा शब्दात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. यापुढे राज ठाकरे यांनी त्यांना सुचक सल्ली देत लिहिले की, आपण तरी बेसावध राहू नका, सावधपणे पावले टाका, पुन्हा एकदा आपले अभिनंदन, असं ट्विट राज ठाकरेंनी केलं आहे.


हेही वाचा : आपण तरी बेसावध राहू नका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज ठाकरेंचा सल्ला