घर देश-विदेश महाराष्ट्राच्या सूनबाई IAS टीना डाबी यांच्या घरी गुडन्यूज; देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव

महाराष्ट्राच्या सूनबाई IAS टीना डाबी यांच्या घरी गुडन्यूज; देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव

Subscribe

टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांची कोरोना काळात दोघांची भेट झाली होती.

नवी दिल्ली : आयएएस अधिकारी टीना डाबी आणि त्यांचे पती आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे या जोडप्याच्या घरी चिमुरड्याचे आगमन झाले आहे. टीना डाबी यांनी जयपूर (राजस्थान) मधील रुग्णालयात मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.(Good news at the home of Maharashtras daughter in law IAS Tina Dabi Greetings from all over the country)

टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांची कोरोना काळात दोघांची भेट झाली होती. दोघांवरही सरकारने जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी सोपवली होती. याचदरम्यान दोघांची भेट झाली आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. एप्रिल 2022 मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले होते. 15 सप्टेंबरला टीना डाबी यांनी मुलाला जन्म दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : INDIA आघाडीत आणखी एक पक्ष होणार सहभागी; प्रियंका गांधींनी घेतला पुढाकार

हे आहे टीना डाबी यांचे महाराष्ट्र कनेक्शन

2015 मध्ये टीना डाबी या प्रतिष्ठित नागरी सेवा परीक्षेत अव्वल आलेल्या दलित समाजातील पहिली व्यक्ती ठरल्या होत्या. दरम्यान प्रदीप गावंडे 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. प्रदीप गावंडे महाराष्ट्राच्या लातूरमधील आहेत. प्रदीप गावंडे यांच्या वडिलांचं नाव केशवराव गावंडे असून आईचं नाव सत्यभामा गावंडे आहे. तर टीना डाबी यांचे पतीच महाराष्ट्रीयन नाही तर टीना डाबी यांची आईदेखील मराठी आहे. टीना यांची आई हिमानी डाबी महाराष्ट्रातील कांबळे कुटुंबातून आहेत. त्यांचे आजोबा माधवराव कांबळे हे स्टेशन मास्तर होते. टीना डाबी यांचं कुटुंब बाबासाहेब आंबेडकरांसोबत अनेक लढ्यातही सामील झाले होते.

- Advertisement -

हेही वाचा : कुख्यात दहशतवादी उजैर खानचा खात्मा; अनंतनागमध्ये शांततेचे वातावरण

प्रदीप गावंडे हे डाबींचे दुसरे पती

टीना डाबी यांचे पती प्रदीप गावंडे हे पहिले पती नसून त्यांचे हे दुसरे लग्न आहे. 2018 चे आयएएस अतहर खान यांच्यासोबत त्यांचे पहिलं लग्न झाले होते. अतहर खान 2016 च्या युपीएससी परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाचे टॉपर होते. ट्रेनिंगदरम्यान टीना आणि अतहरमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. लग्नाच्या दोन वर्षानंतर म्हणजेच 2020 मध्ये त्यांनी सहमतीने घटस्फोट घेतला होता.

- Advertisment -