घरमहाराष्ट्रग्राहकांसाठी गुड न्यूज! धनत्रयोदशीपूर्वी सोने- चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

ग्राहकांसाठी गुड न्यूज! धनत्रयोदशीपूर्वी सोने- चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Subscribe

यूएस बॉण्ड उत्पन्नामध्ये किंचित वाढ झाल्यामुळे सोन्याच्या किमतीत थोडी घसरण झाली आहे. मागच्या दहा ते बारा दिवसांत सोन्याने मोठा दिलासा आहे. सोने 1 हजार 650 रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे आता ग्राहक सराफा बाजाराकडे वळले आहेत.

मुंबई: दिवाळी सण तोंडावर आला असताना लोकांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे. अशातच एक खुशखबर आहे. आज सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे दिवाळी आणि लग्नसराईच्या खरेदीच्या विचार करत असणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यूएस बॉण्ड उत्पन्नामध्ये किंचित वाढ झाल्यामुळे सोन्याच्या किमतीत थोडी घसरण झाली आहे. मागच्या दहा ते बारा दिवसांत सोन्याने मोठा दिलासा आहे. सोने 1 हजार 650 रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे आता ग्राहक सराफा बाजाराकडे वळले आहेत. (Good news for customers Fall in gold silver prices ahead of Dhantrayodashi Know today s price)

सोनं 1 हजार 650 रुपयांनी स्वस्त

मागच्या पंधरा दिवसांत सोन्याचा भाव उतरला आहे. सोने 1 हजार 650 रुपयांनी स्वस्त झालं आहे. या आठवड्यात 400 रुपयांची घसरण झाली. यापूर्वी 4 नोव्हेंबर रोजी सोने 110 रुपयांनी उतरले. 5 नोव्हेंबरमध्ये बदल झाला नाही. तर 6 नोव्हेंबर रोजी 150 रुपयांनी भाव उतरले. 7 नोव्हेंबर रोजी 100 रुपयांची घसरण झाली. 8 नोव्हेंबर रोजी किंमती 160 रुपयांनी घसरल्या. आता 22 कॅरेड सोने 56 हाजर 250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61 हजार 350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

- Advertisement -

चांदी 1700 रुपयांनी स्वस्त

चांदीने गेल्या आठवड्यात 2 नोव्हेंबर रोजी 700 रुपयांची उसळी घेतली आणि नंतर तेवढीच घसरण झाली. 4 नोव्हेंबर रोजी त्यात 900 रुपयांची वाढ झाली. 6 नोव्हेंबर रोजी चांदी 200 रुपयांनी महागली. पण नंतर चांदीने आनंदवार्ता दिली. 7 नोव्हेंबर रोजी किंमती 700 रुपयांनी घसरल्या. 8 नोव्हेंबर रोजी 1 हजार रुपयांची स्वस्ताई आली. गुड रिटर्न्सनेदिलेल्या माहितीनुसार, एक किलो चांदीचा भाव 73 हजार 500 रुपये आहे.

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक Verify HUID द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धतादेखील तपासू शकता.

- Advertisement -

(हेही वाचा: NCP Crisis : राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगात आज पुन्हा सुनावणी; निकाल कुणाच्या बाजूने? )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -