घरमहाराष्ट्रघर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर; पुढील तीन महिने मिळणार मुद्रांक शुल्कात सवलत

घर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर; पुढील तीन महिने मिळणार मुद्रांक शुल्कात सवलत

Subscribe

घर खरेदी करणाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मालमत्ता खरेदीवरील मुद्रांक शुल्कात (Stamp Duty) सवलत दिली आहे. १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ पर्यंत १.५ टक्के इतकी सवलत मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मालमत्ता खरेदीदारांना फायदा होणार आहे. बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्क सवलत देण्यात आली आहे. याआधी देखील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात आली आहे. याआधी देण्यात आलेली ३ टक्के मुद्रांक शुल्क सवलत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मर्यादित आहे.

लॉकडाऊनमुळे बांधकाम व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे या व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने १ सप्टेंबरपासून ६ टक्के असलेल्या मुद्रांक शुल्कात ३ टक्क्यांपर्यंत कपात केली होती. मुद्रांक शुल्क कमी केल्यानंतर नागपूर जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात दस्त नोंदणी (रजिस्ट्री) वाढल्या होत्या. दरम्यान, ३ टक्क्यांची सवलत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत राहणार आहे. मुद्रांक शुल्क सवलत देण्याच्या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्राला चालना मिळाली आहे.

- Advertisement -

दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत

महाविकास आघाडी सरकारने पुढील दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही सवलत मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण (MMRDA), पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या विभागातील ग्राहकांसाठी आहे. दस्त नोंदणीच्यावेळी भराव्या लागणाऱ्या एकंदरीत मुद्रांक शुल्क आणि इतर निगडीत भारामध्ये ही सवलत देण्यात आली होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -