घरमहाराष्ट्रमुंबईकरांना मोठं गिफ्ट.. नवी ६ रेल्वे स्टेशन सुरू होणार! कुठे असतील? जाणून...

मुंबईकरांना मोठं गिफ्ट.. नवी ६ रेल्वे स्टेशन सुरू होणार! कुठे असतील? जाणून घ्या

Subscribe

मुंबईकरांना लवकरच एक मोठं गिफ्ट मिळणार आहे. लोकल ट्रेनची सेवा देणारी सहा स्थानके एकाच वेळी लोकांसाठी खुली होण्याची मुंबईतील ही पहिलीच वेळ आहे.

मुंबईकरांना लवकरच एक मोठं गिफ्ट मिळणार आहे. लोकल ट्रेनची सेवा देणारी सहा स्थानके एकाच वेळी लोकांसाठी खुली होण्याची मुंबईतील ही पहिलीच वेळ आहे. या सहा स्थानकांपैकी पाच स्थानके उरण मार्गाच्या नवीन विस्तारावर आहेत आणि एक ठाणे-वाशी कॉरिडॉरवर आहे. स्थानकांवरील बांधकामाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. नवीन उरण मार्गावरील पाच स्थानकांमध्ये गव्हाणपाडा, रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी आणि उरण यांचा समावेश आहे तर दिघे स्थानक ठाणे-वाशी कॉरिडॉरवर आहे.

या नव्या स्थानकांची भर पडल्याने मुंबईतील एकूण लोकल ट्रेन स्थानकांची संख्या आता १२३ होईल. या सर्व स्थानकांचे काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच ते वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहे.

- Advertisement -

नवी मुंबई नवीन विकसनशील भागांशी जोडली जाणार
या स्थानकांचा सर्वाधिक फायदा नवी मुंबईकरांना होणार आहे. बेलापूर-सीवूड-उरण रेल्वे प्रकल्प हा नवी मुंबईच्या मध्यवर्ती भागाचा आसपासच्या विकसनशील भागांशी जोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या रेल्वे प्रकल्पात नागरी आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) आणि महाराष्ट्र सरकारचे रेल्वे हे दोन्ही मिळून खर्च उचलत आहेत. प्रकल्पाच्या खर्चाचा एक तृतीयांश खर्च रेल्वेने तर दोन तृतीयांश सिडकोने केला आहे.

नवीन लाईन सध्याच्या हार्बर लाईनला दोन पॉइंटवर जोडली जाईल. बेलापूर/नेरुळ उरण विभागातील २७ किमी लांबीच्या खारकोपरपर्यंतच्या १२.४० किमी दुहेरी मार्गाचा पहिला टप्पा ११ नोव्हेंबर २०१८ पासून कार्यान्वित होणार आहे, तर उर्वरित १४.६० किमी लांबीचा खारकोपर ते उरण या पाच स्थानकांसह आता लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे २,९०० कोटी रुपये आहे.

- Advertisement -

दिघे स्थानकाला रेल्वे राज्यमंत्र्यांनी भेट दिली
दिघे स्टेशन हा एलिव्हेटेड कॉरिडॉरचा भाग आहे. नवी मुंबई ट्रान्स हार्बर लाईन आणि मेन लाईन यांना जोडण्यासाठी ते ऐरोली आणि कळवा दरम्यान बांधले जाईल. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतीच नवी मुंबई उपनगरीय नेटवर्कवरील विविध स्थानकांवरील स्वच्छता आणि दुरुस्तीच्या कामांसह स्थानकांवर उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी दिघे स्थानकाची स्थितीही पाहिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -