घरताज्या घडामोडीसाईभक्तांसाठी दिलासादायक बातमी! आरती पास काऊंटरवर मिळणार

साईभक्तांसाठी दिलासादायक बातमी! आरती पास काऊंटरवर मिळणार

Subscribe

साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून आणि महाराष्ट्रातील अनेक भागांतून हजारो भक्त शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. परंतु साईबाबांच्या दर्शनासाठी साईभक्तांना आता आरती पास काऊंटरवर मिळणार आहे. त्यामुळे भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच याबाबत ग्रामस्थ आणि साईमंदिर प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

झटपट दर्शन आणि आरती पास काढून देण्याच्या नावाखाली शिर्डीत अनेकजण गोरखधंदा करत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. सुरक्षा रक्षकांनी आर्थिक संबंधातून पैसे कमावण्याचा अनेकांनी धंदा सुरू केल्याने ग्रामस्थही आक्रमक झाले होते. त्यामुळे शिर्डीतील ग्रामस्थ आणि साईमंदिर प्रशासनाची आज बैठक झाली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून आता भक्तांना आरती पास काऊंटरवर मिळणार आहे.

- Advertisement -

येत्या १० ते १५ दिवसांमध्ये या विषयांची अंमलबजावणी केली जाणार आहे. भक्तांना शिफारशीने दिले जाणारे आरती पास आता थेट दिले जाणार असून ग्रामस्थांसाठीही आधार कार्ड दाखवून ३ नं. प्रवेशद्वाराहून एन्ट्री मिळणार आहे. तसेच ग्रामस्थांसोबत अन्य कुणालाही सोडले जाणार नाहीये. त्याचप्रमाणे साईसंस्थान कर्मचाऱ्यांना साईभक्तांसोबत वागण्याचे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. त्यामुळे मंदिरात दर्शनाचा होणारा काळाबाजार आता थांबणार आहे.

बैठकीत नेमके काय निर्णय झाले?

– शिर्डी ग्रामस्थांना आधार कार्ड दाखवून मिळणार दर्शनासाठी प्रवेश

- Advertisement -

– ग्रामस्थांसोबत अन्य कुणालाही सोडले जाणार नाही

– साई संस्थानाच्या कर्मचाऱ्यांना मोबाईल आणण्यास बंदी

– साईभक्तांना आरती पाससाठी शिफारशीची गरज नसणार

– साईसंस्थान कर्मचाऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण

– साई भक्तांसोबत वाद न घालता सामंजस्याने वागण्याचे आदेश


हेही वाचा : आता ‘वज्रमूठ’ सभा होणार नाही? नाना पटोलेंचं मोठं विधान


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -